शेतकरी कायद्याविरोधात भुमिपुत्र ब्रिगेडचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST2020-12-11T04:55:36+5:302020-12-11T04:55:36+5:30

चंद्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात भूमिपुत्र ब्रिगेड व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जटपुरा गेट येथे ...

Bhumiputra Brigade's agitation against farmers' law | शेतकरी कायद्याविरोधात भुमिपुत्र ब्रिगेडचे आंदोलन

शेतकरी कायद्याविरोधात भुमिपुत्र ब्रिगेडचे आंदोलन

चंद्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात भूमिपुत्र ब्रिगेड व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जटपुरा गेट येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यात आला.

केंद्र सरकारने बहुमताच्या बळावर तीन कृषी कायदे प्रारित केले आहेत. केंद्रसरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी जमीनदोस्त होत आहेत. कृषीप्रधान भारतामध्ये शेतकरी राजा असायला पाहिजे होता. परंतु, वस्तूस्थिती वेगळी आहे. अन्नदात्यांची सर्रास पिळवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांनी आता स्वयंप्रेरणेने स्वतःच्या अस्तित्वाचा लढा दिल्ली येथे पुकारला आहे. मागील आठ दिवसांपासून भर थंडीत जीवाची बाजी लावून शेतकरी लढत आहेत. त्यांना भूमिपुत्र ब्रिगेड आणि शेतकरी संघर्ष समितीतर्फे पाठींबा देऊन कृषी कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. समीर कदम, भूमिपुत्र ब्रिगेड शेतकरी संघर्ष समितीच्या डॉ. अभिलाशा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे, विजय मुसळे, बंडू हजारे, डॉ. राकेश वनकर, डॉ. सिराज खान, विलास माथनकर, हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरूनुले, ॲड. प्रशांत सोनुले, अविनाश आंबेकर, धानोरकर, पांडुरंग गावतुरे, सुरेंद्र रायपुरे, जितेंद्र डोहणे, अमोल शेंडे, रुपेश चांदेकर, साधू मुसळे, सुमित देवगडे, सईदा शेख, हेमंत भगत, सोनल भगत, संजय बुरडकर, संतोष रखुंडे, संजय फाले, छाया सोनुले, विवेक बोरीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Bhumiputra Brigade's agitation against farmers' law