भद्रावतीच्या विद्यार्थी क्रीडा मंडळाने पटकाविले अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:51 IST2021-02-18T04:51:34+5:302021-02-18T04:51:34+5:30

बल्लारपूर : येथील पाखडी हनुमान व्यायाम व क्रीडा मंडळद्वारा आयोजित हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने झालेल्या महिला तसेच पुरुष ...

Bhadravati's student sports board won the title | भद्रावतीच्या विद्यार्थी क्रीडा मंडळाने पटकाविले अजिंक्यपद

भद्रावतीच्या विद्यार्थी क्रीडा मंडळाने पटकाविले अजिंक्यपद

बल्लारपूर : येथील पाखडी हनुमान व्यायाम व क्रीडा मंडळद्वारा आयोजित हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने झालेल्या महिला तसेच पुरुष कबड्डी सामन्यात पुरुष संघामधून भद्रावती येथील विद्यार्थी क्रीडा मंडळ तर महिला संघामधून बल्लारपूर येथील श्री राम बालक आखाडा या चमू अजिंक्य ठरल्या.

उपविजेते दोन्ही संघात श्री विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूर ही चमू ठरली.

दोन दिवसाच्या या सामन्यात २४ पुरुष व सहा महिला संघांनी जिल्हाभरातून भाग घेतला होता. सामन्याचे उद्घाटन साईबाबा वॉर्डाच्या नगरसेविका अरुणा रवींद्र कोडापे यांनी केले. बक्षीस वितरण नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव दिलीप पवार, अनिल माळवे, संतोष चौहान, रवींद्र कोडापे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पुरस्कार २१ हजार, १५ हजार रुपये रोख तसेच ट्रॉफी देण्यात आली.

Web Title: Bhadravati's student sports board won the title