शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय मूल्यमापनात भद्रावती नगरपरिषद प्रथम

By admin | Updated: March 26, 2016 00:43 IST

नागपूर विभागातील ६७ नगरपरिषदांच्या प्रशासकीय कामकाजाचे नुकतेच मुल्यमापन करण्यात आले.

अधिकाऱ्यांचा सत्कार : विभागातील ६७ नगरपरिषदांचे मूल्यमापनभद्रावती: नागपूर विभागातील ६७ नगरपरिषदांच्या प्रशासकीय कामकाजाचे नुकतेच मुल्यमापन करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवून भद्रावती नगरपरिषदेने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला.प्रधान सचिव नगरपरिषद संचालनालय वरळी मुंबईच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्या मार्फत एका नगरपरिषदेचे मुल्यमापन दुसऱ्या नगरपरिषदेने केले. या मुल्यांकनात ६७ नगरपरिषदांमधून सर्वाधिक गुण मिळवत भद्रावती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकाविला. १०० पैकी ६८.५ टक्के गुण भद्रावती नगरपरिषदेला मिळाले. स्वच्छ भारत मिशनमध्ये घनकचरा व्यवस्थापन, प्लॉस्टीक बॅग निर्मूलन, घरोघरी शौचालय, यासाठी २० पैकी १९ गुण प्राप्त झालेत. आॅडीट रिपोर्ट तसेच शासनाला वेळेवर माहिती पाठविणे, यासाठी प्रत्येकी पाच-पाच गुण मिळाले. ई गव्हर्नरसाठी पाचपैकी पाच गुण मिळाले.यासोबतच द्वि नोंद लेखापद्धती, कर जमा करणे, युजर चार्जस, शासकीय निधी वेळेत खर्च करणे, रोजगार निर्मितीमधून नागरी उपजिवीका अभियान याबाबत मूल्यमापन करून भद्रावती नगर परिषदेला प्रथम क्रमांक देण्यात आला. विभागीय आयुक्त नागपूर यांच्यावतीने सदर घोषणा करण्यात आली. नागपूर विभागातील ६७ नगरपरिषदांमधून प्रथम भद्रावती नगरपरिषद, द्वितीय वरोरा नगरपरिषद, तर तृतिय राजुरा नगरपरिषदेला क्रमवारी स्थान देण्यात आले. यानिमित्ताने भद्रावती नगरपरिषदेच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षांच्यावतीने येथील मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरसेवक झाडे, तसेच नगर परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)भद्रावती नगरपरिषदेला विभागातून प्रथम क्रमांक मिळणे, ही भद्रावतीकरांसाठी आनंदाची बाब आहे. स्वच्छतेसोबतच इतरही बाबतीत विभागातून नव्हे तर राज्यातूनही भद्रावती नगरपरिषद प्रथम क्रमांकावर रहावी, हा मानस आहे. यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. -अनिल धानोरकर,नगराध्यक्ष, भद्रावतीकामकाज पद्धतीत आणखी सुधारणा करून आयएसओ नामांकनासाठी प्रयत्न करणार आहोत. जास्तीत जास्त सेवा नागरिकांना आॅनलाईन पुरविण्यात येईल. बांधकाम परवानगी आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. १ एप्रिलपासून याला सुरूवात होत आहे.-विनोद जाधव नगरपरिषद भद्रावती,