शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडी घोटाळ्यावर सत्ताधाऱ्यांचे मौन

By admin | Updated: March 23, 2016 01:01 IST

जिल्हा परिषदेत गेल्या कित्येक दिवसांपासून बैलबंडी घोटाळा गाजत आहे. या घोटाळ्याची एका समितीमार्फत चौकशी

चंद्रपूर : जिल्हा परिषदेत गेल्या कित्येक दिवसांपासून बैलबंडी घोटाळा गाजत आहे. या घोटाळ्याची एका समितीमार्फत चौकशी झाली. त्यानंतर चौकशी समितीचा अहवाल सोमवारी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत सादर झाला. मात्र अहवाल वाचून दाखविण्यास समिती अध्यक्षांनी मौन बाळगल्याने तुर्तास चौकशी समितीचा अहवाल गुलदस्त्यात आहे.जिल्हा परिषदेमार्फत अनेक शेतकऱ्यांना बैलबंडी वाटप करण्यात आले. मात्र वाटप करण्यात आलेल्या बैलबंडी निकृष्ट दर्जाचे व कमी वजनाचे होते. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्याकडे तक्रार करताच जिल्हा परिषदेच्या सभेत बैलबंडी वाटपाचा मुद्दा गाजला. गेल्या कित्येक सभांमध्ये बैलबंडीचा मुद्दा गाजल्याने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीने संपूर्ण जिल्हाभर फिरून शेतकऱ्यांना वाटप केलेल्या बैलबंडीची चौकशी केली. ही चौकशीही गेल्या काही दिवसांपुर्वीच पूर्ण झाली. मात्र समितीने चौकशी अहवाल सादर केला नव्हता. विरोधकांकडून सतत आरोप होत असताना सोमवारी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत चौकशी समितीच्या अध्यक्ष कल्पना बोरकर यांनी चौकशी अहवाल जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्याकडे सादर केला. यावर विरोधकांनी अहवाल वाचून दाखविण्याची मागणी चौकशी समिती अध्यक्षांकडे केली. मात्र कल्पना बोरकर यांनी अहवाल २५ ते ३० पानांचा आहे, वाचायला खूप वेळ लागेल, असे सांगत अहवाल सभेपुढे वाचायला स्पष्ट नकार दिला. सभा आटोपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनाही पत्रकारांनी समितीच्या अहवालाबाबत प्रश्न विचारले. मात्र त्यांनीही यावर मौन बाळगून अहवाल आपल्याकडे सादर झाला आहे, एवढेच उत्तर दिले. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालात नेमके काय दडले आहे, निकृष्ठ बैलबंडी वाटपात कोण दोषी आहे, कुणावर कारवाईची शिफारस आहे, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)घोटाळा दाबण्याचा प्रयत्न४चौकशी समितीचा अहवाल सादर करून अहवाल वाचन करण्यास समितीच्या अध्यक्षांनी नकार दिला. सभेत अहवाल सादर झाला असला तरी बैलबंडी घोटाळ्याबाबत समितीचा अभिप्राय गुलदस्त्यात आहे. बैलबंडीचा पुरवठा हा एमआयडीसीने केल्याचे सांगत सत्ताधारी बैलबंडी घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच अहवाल सभेत वाचन करण्यास नकार दिला, असा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे.