शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

घराघरात संवाद तुटणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

राज्यात पोलीस दलाच्या सायबर शाखेतर्फे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहभागात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी एकाच दिवशी सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । किशोर जोरगेवार, सायबर सेफ वुमेन कार्यशाळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सार्वजनिक जीवनात वावरताना दररोज एखादी तरी तक्रार ही सोशल माध्यमांवर फसवणूक झाल्याची असते. अनेक तक्रारी पोलिसांपर्यंत येत नाही. त्यामुळे याची व्याप्ती मोठया प्रमाणात असून या आभासी जगामध्ये वावरताना घराघरात संवाद तुटणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी केले.राज्यात पोलीस दलाच्या सायबर शाखेतर्फे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहभागात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी एकाच दिवशी सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून मोठया प्रमाणात मुली व महिलांना सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यावेळी उपस्थिताशी संवाद साधताना पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे इंटरनेट क्षेत्रांमधल्या होणाऱ्या फसवणुकीचा आढावा सादर केला. इंटरनेटच्या माध्यमातून आपला खासगीपणा कशा पद्धतीने संपुष्टात येऊ शकतो व त्यासंदर्भात जिल्हास्तरावर झालेल्या अनेक गुन्ह्यांची माहितीदेखील त्यांनी दिली. सायबर गुन्हे कसे होतात. सायबर गुन्ह्याचे प्रकार काय असतात. घटस्फोटिता, एकटया महिला, मुलींना विशेषत: कशा पद्धतीने फसविले जाते, ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने आर्थिक व्यवहारात फसविले जाते, याची उदाहरणे दिली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, साहायक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाला जेसीआयचे अध्यक्ष शीतल पडगीलवार, जेसीआय गरीमाच्या अध्यक्ष शीतल लोहिया, जेसीआय इलाईटच्या अध्यक्ष राधिका सारडा, महर्षी विद्या मंदिराचे संचालक गिरीष चांडक, सर्व समान बहु. महिला संस्था अध्यक्ष डॉ. भारती दुधानी, फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपचे अध्यक्ष सरिता मालू, सोनम मडावी, मंदा पडवेकर, मुस्लिम एज्युकेशन संघटनाच्या शाहीन शेख, डॉ. सुनिता मुंधडा, भरत बजाज, प्रतिक सारडा उपस्थित होते.