शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

बरिसोपाच्या संघर्ष यात्रेचा बल्लारपुरात समारोप

By admin | Updated: January 17, 2016 00:52 IST

बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी या नावाने उदयाला आलेल्या पक्षाने नागपूरहून काढलेल्या विदर्भ संघर्ष यात्रेचा येथे बुधवारी समारोप झाला.

विविध विषयावर मंथन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढाऱ्यांचे मार्गदर्शनबल्लारपूर : बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी या नावाने उदयाला आलेल्या पक्षाने नागपूरहून काढलेल्या विदर्भ संघर्ष यात्रेचा येथे बुधवारी समारोप झाला. यानिमित्त येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अ‍ॅड. सुरेश माने होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर दशरथ मडावी, कादिरभाई, सिद्धार्थ पाटील, अशोक वनकर, गोपाल मेंढे, बल्लारपूर न.प.चे उपाध्यक्ष संपत कोरडे, नगरसेवक राजू झोडे, विक्की दुपारे, गणेश कोकाटे, वंदना तामगाडगे यांची उपस्थिती होती.विदर्भ राज्य निर्मिती, प्रत्येक शेतकऱ्याला व शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन म्हणून प्रतिमाह चार हजार रुपये मिळावेत, खासगी उद्योगात आरक्षण, मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण, बहुजन विद्यार्थी धोरणात बदल या यासह मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने नागपूरहून ही संघर्ष यात्रा काढली. विदर्भातील विविध ठिकाणांहून येत माता जिजाऊ जयंती दिनी मंगळवारी यात्रा बल्लारपुरात पोहचली. यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात वरील मुद्यावर नेत्यांनी जोरकस भाषणे दिली. कादिरभाई यांनी विदर्भ राज्य वेगळा का हवा, याचे विश्लेषण करीत शासनकर्ते विदर्भावर कसा अन्याय करीत आहेत, याचे आकड्यांसह विवेचन केले. दशरथ मडावी हे प्रखर व तितक्याच मुद्देसूद भाषणातून आदिवासींच्या समस्यांवर पोटतिडकीने बोलले. भाजपा शासनावर ताशेरे ओढले व आदिवासींचे नाव बदलवून त्या जागी ‘वनवासी’ नाव ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव कोणता, याचे विश्लेषण करीत भाजपाच्या तुलनेत काँग्रेस शासन काही अंशी चांगले होते अशी पुस्ती जोडली. सिद्धार्थ पाटील यांनीही विविध विषयाला स्पर्श करीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न विस्तृतपणे मांडला. त्याचप्रमाणे सध्याची बहुजन समाजवादी पार्टी ही आंबेडकरी विचारापासून दूर जात असल्याने तो पक्ष सोडून आम्ही हा नवीन पक्ष स्थापन केला असल्याचे स्पष्ट करीत या पक्षाचे ध्येय धोरणे काय, ते सांगितले. माने यांनी पक्षाची भूमिका विषद करीत आंदोलनाचा पुढील टप्पा कोणता याची रूपरेषा मांडली. (तालुका प्रतिनिधी)