शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांच्या खत, बियाण्यांच्या विक्रीवर बंदी

By admin | Updated: July 2, 2014 23:16 IST

नियमांची पायमल्ली करीत खते व बियाण्यांंची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे कृषी विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत राजुरा तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली.

कृषी विभागाची कारवाई : विविध पाच केंद्राचा समावेशचंद्रपूर : नियमांची पायमल्ली करीत खते व बियाण्यांंची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे कृषी विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत राजुरा तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली. यात ३६ लाखांचे खत, बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कृषी अधिकारी आर.आर. राठोड यांनी ही कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या कृषीकेंद्रात चांडक ट्रेडर्स, रोहित अ‍ॅग्रो, साईराम कृषीकेंदम अहेरी, साईबाबा कृषी केंद्र गोवरी, वैष्णवी कृषी केंद्र भुरकुंडा बूज यांचा समावेश आहे. कृषी केंद्रावर होत असलेल्या बियाण्यांच्या काळया बाजारावर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने काही कृषीकेंद्रावर छापा टाकला. यात कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या बियाण्यांच्या स्टॉकवर विक्रीबंदीचे आदेश दिले. तालुक्यात ९४ परवानाधारक कृषी केंद्रे आहेत. यात ७५ बियाणे कृषी केंद्रे, ८८ खतांची कृषी केंद्रे सुरू आहेत. किटकनाशक विक्रीसाठी ८१ परवानाधारक आहेत. यापैकी ६९ विक्री केंद्रे सुरू आहेत. तालुक्यात युरिया खताची १ हजार ६५६ मेट्रीक टन विक्री झाली. डीएपी खताची ७२० मे. टन विक्री झाली. तालुक्यात कापूस बियाण्यांच्या ८५ हजार ६१९ बॅग उपलब्ध झाल्या. यात ३९ हजार ४०७ पाकिटांची विक्री झाली आहे. सोयाबीन बियाणे ७ हजार ७२ क्विंटल उपलब्ध आहे. यापैकी ५ हजार ८३४ क्विं. बियाण्यांची विक्री झाल्याची माहिती राठोड यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)