शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्याने केला हागणदारीमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: November 22, 2015 00:48 IST

शासनाने गावापासून देशपातळीवर स्वच्छता मिशन सुरू केले. या अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय आहे.

विदर्भातून प्रथम राहू : महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला विश्वासबल्लारपूर : शासनाने गावापासून देशपातळीवर स्वच्छता मिशन सुरू केले. या अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय आहे. यासाठी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असून विदर्भात बल्लारपूर हागणदारीमुक्तीत पहिल्या स्थानावर राहणार, असा विश्वास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुरुवारी विसापूर येथे व्यक्त केला.विसापूर ग्रामपंचायतीच्या प्रांगणावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. यात हागणदारी मुक्त गाव अभियानात उत्कृष्ट कार्य करणारे बामणी (दुधोली) येथील सरपंच सुजाता टिपले, आमडीच्या सरपंच अर्चना सुरेश वासाडे, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी आणि दत्तक कुटूंब घेवून शौचालय बांधकाम करून देणारे जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांचा शाल, श्रीफळ व वृक्ष प्रदान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन विसापूर येथील सरपंच रिता जिलटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, उपसरपंच सुनील रोंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अंकुश केदार, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, मनुष्यबळ विकास तज्ञ बी.के. हिरवे, राज्य समन्वयक महेश कोडगिरे, विसापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कुकडपवार, सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी आर. एम. सोनसुल, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटी यांची उपस्थिती होती.याप्रसंगी शौचालय बांधकाम करुन वापर करीत असल्याबाबत प्रेरणा देणारे लाभार्थी आनंदराव परचाके, ललीता पोरटे, वच्छला आत्राम व संध्या नागापूरे यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. प्रास्ताविक संध्या दिकोंडवार यांनी केले. संचालन सरोज नागातुरे यांनी तर आभार मुकेश भालेराव यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)