शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात दररोज २२ टक्के गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देजलवाहिन्या बदलविण्याचे काम सुरू। ४५ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

मंगल जीवने ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे दोन वर्षांपासून बदलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीत दररोज सुमारे २२ टक्के जल गळती होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या अंतर्गत शहरातील ३२ वॉर्डात टाकण्यात आलेले पाईप लाईनचे काम ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त झाले.काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. शहराची लोकसंख्या ८९ हजार ४५२ च्या घरात आहे.त्यानुसार प्राधिकरणाकडे नळधारक ग्राहकांची अधिकृत संख्या ९ हजार १६३ तर अनाधिकृत ग्राहकांची संख्या ८७ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहराला दररोज पाणी पुरविण्यात येत आहे.नळग्राहक जागृत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे २२ टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याची गळती आहे. नळाच्या तोट्या काढणे, मीटर काढणे, अवैध जोडणीला आळा घालणे सुरू असले तरी पाणी पुरवठा नळयोजना ६० लाखांच्या वर तोट्यात आहे.- एस.बी.येरणे, शाखा अभियंता, मजीप्रा बल्लारपूरपाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व तसेच तुटलेल्या पाइपमधून पाण्याची गळती अधिक आहे. याचा भुर्दंड प्रामाणिक नळधारककांना बसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण आणले तर शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते- संजय डुंबेरे, सामाजिक कार्यकर्तावर्धा नदीला मुबलक पाणी असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाई होत नाही जनतेच्या सहभागामुळे सर्वांना पाणी मिळते. नगर परिषदेने लावलेले २३० सार्वजनिक नळ बंद केल्या जात आहेत. आतापर्यंत ९२ नळ बंद केले आहे. जीवन प्राधिकरणच्या एक लिटरची पाण्याची बॉटल ग्राहकांना केवळ १८ पैशाला पडते.- सुशील पाटील,उपविभागीय अभियंता

टॅग्स :Waterपाणी