शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जवानाच्या सतर्कतेने गवसली विसरलेली बॅग

By admin | Updated: June 10, 2015 01:33 IST

सिकंदराबाद येथून रेल्वेने वरोरा येथे एक कुटुंब उतरले. त्यानंतर रेल्वे जाताच रेल्वेमध्ये बॅग विसरल्याचे लक्षात आले.

वरोरा रेल्वे स्थानकावरील घटना : चार लाखांचे सोने मिळाले परत वरोरा : सिकंदराबाद येथून रेल्वेने वरोरा येथे एक कुटुंब उतरले. त्यानंतर रेल्वे जाताच रेल्वेमध्ये बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्या कुटुंबियानी वरोरा रेल्वे स्थानकावर असलेल्या आरपीएफ जवानास माहिती दिली. या जवानाने तातडीने संपर्क केला तेव्हा ती बॅग बुट्टीबोरी येथील रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांनी उतरवून त्या प्रवाशांना बोलावून परत केली. त्या बॅग मध्ये चार लाख रुपये किंमतीचे सोन होते. सोने सहीसलामत असल्याने त्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.सिकंदराबाद-नागपूर या रेल्वेने सिकंदराबाद येथून एक कुटुंब प्रवास करीत पहाटे वरोरा रेल्वे स्थानकावर उतरले. त्यांना वरोरा रेल्वे स्थानकावरुन नंदीग्राम एक्स्प्रेसने वणी येथे जायचे होते. वरोरा रेल्वे स्थानकावर उतरताच रेल्वे सुरु झाली. त्यामध्ये कुटुंबीयाची बॅग राहून गेली. ही बाब लक्षात येताच वरोरा रेल्वे स्थानकावरील आरपीएफ चौकीत धाव घेतली व येथे कार्यरत जवान आर. टी. दाबेराव यांना माहिती दिली. दाबेराव यांनी तत्काळ सेवाग्राम, बुट्टीबोरी, हिंगणघाट, नागपूर आदी आरपीएफ ठाण्यात माहिती दिली. ही बॅग बुट्टीबोरी येथील आरपीएफ उपनिरीक्षक गिरीश तिवारी यांनी उतरवून घेत वरोरा येथील आरपीएफला कळविले. आरपीएफ जवान आर. टी. दाबेराव यांनी बॅग बुट्टीबोरी येथील रेल्वेस्थानकावरील आरपीएफ चौकीत असल्याचे माहिती कुटुंबीयास देऊन त्यांना बुट्टीबोरी येथे जाण्यास सांगितले. बुट्टीबोरी येथे बॅग व त्यातील साहित्य सुरक्षित असल्याचे बघून ते कुटुंब सुखाहून गेले. जवानाच्या प्रामाणिकपणा बद्दल रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्याकरिता कुटुंबाने तयारी दर्शवली. परंतु आरपीएफ जवानांनी बक्षिस नाकारून आपले कर्तव्य सिद्ध करत प्रामाणिकपणा दाखविला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानत पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. (तालुका प्रतिनिधी)