शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडीने शेतकरी धडकले तहसीलवर

By admin | Updated: December 24, 2015 00:55 IST

अपुऱ्या पावसामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मूल तालुक्यातील धान, सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पूर्णत: खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

दुष्काळ जाहीर करा : मूल तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांचा सहभागमूल : अपुऱ्या पावसामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मूल तालुक्यातील धान, सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पूर्णत: खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी पंचायत समिती मूल अंतर्गत बेंबाळ प्रभागाच्या १३ गावातील शेतकरी मूल तहसील कार्यालयावर बैलबंडीसह धडकले. यावेळी जवळपास २५० बैलबंड्यासह हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार राजेश सरवदे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. धानाला ३५०० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, खतावर ५० टक्के अनुदान द्यावे, मूल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, गोसीखुर्दचे पाणी गोवर्धन उपकालव्यापर्यंत सोडावे, आणेवारी चुकीच्या पद्धतीने झाल्याने फेरआणेवारी करण्यात यावी, असोंलामेंढा कालव्याचे सब मायनर पावसाळ्याआधी नुतनीकरण करावे तसेच इतर महत्त्वाच्या मागण्यांची पुर्तता करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाला करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांनी स्वत: बैलबंडी मोर्च्याजवळ जावून निवेदन स्वीकारले व मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बेंबाळ, नवेगाव भूजला, नांदगाव, गोवर्धन, बोडाळा बुज, बोडाळा (खुर्द), कोरंबी, बाबराळा, चकदुगाळा, मालदुगाळा, भजाडी, सितळा आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)