शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून बाप-लेकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने त्याची मुलगी सेजल हीसुद्धा सोबत आली. शेतालगत नाला असल्याने पाणी भरण्यासाठी नाल्यावर आला. नाल्यावर मोटारपंप असून त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता. मुलगी पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात विजेचा धक्का बसला. ती खाली पडली. दरम्यान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या स्वप्नीललाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देराजुरा तालुक्यातील सिंधी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कविरूर स्टेशन : शेतालगत असलेल्या नाल्यावर पाणी भरण्याकरिता गेलेल्या बाप-लेकीला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारात शनिवारी घडली.स्वप्नील सत्यपाल चाहारे (३२) तर सेजल स्वप्नील चाहारे (७) अशी मृतकांची नावे आहेत. मृत स्वप्नील हा आपल्या वडीलाला एकुलता एक होता तर सेजल ही आई वडिलांना एकुलती एक असल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेहमी प्रमाणे स्वप्नील हा आपल्या वडिलांसोबत शेतात काम करण्याकरिता सिंधी शिवारात असलेल्या आपल्या शेतात आला. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने त्याची मुलगी सेजल हीसुद्धा सोबत आली. शेतालगत नाला असल्याने पाणी भरण्यासाठी नाल्यावर आला. नाल्यावर मोटारपंप असून त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता. मुलगी पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात विजेचा धक्का बसला. ती खाली पडली. दरम्यान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या स्वप्नीललाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बराच वेळ होऊन दोघेही परत आले नाही म्हणून स्वप्नीलचे वडील सत्यपाल हे नाल्याकडे गेले. त्यांना दोघेही पाण्यात पडून दिसले. त्यावेळी आरडाओरड केली असता बाजूचे शेतकरी धावत आले. मोटारपंपाचे वायर तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती विरुर पोलीस स्टेशनला मिळताच विरुरचे पोलीस निरीक्षक सदानंद वडतकर, मेजर पवार, मुंडे, जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.अश्रू झाले अनावरमृत स्वप्नील हा एकुलता एक मुलगा होता. त्याची मुलगी सेजल ही त्यांना एकुलती एक होती. दोघांचाही एकाचवेळी असा मृत्यू झाल्याने गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज