The ax on 60 year old mango tree | ६० वर्षांच्या आम्रवृक्षांवर कुऱ्हाड
६० वर्षांच्या आम्रवृक्षांवर कुऱ्हाड

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : आठवणी काळाच्या पडद्याआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : आजपर्यंत ज्यांनी कित्येकांना मायेची सावली दिली. फळांचा गोडवा दिला. त्या आम्रवृक्षांवरच कुºहाड चालविल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाल्याची घटना शहरात मंगळवारी घडली. या घटनेने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला वृक्ष वाचविता आले असते, याकडेही काहींनी लक्ष वेधले.
नागभीड -सिंदेवाही राज्य महामार्गावरील आम्रवृक्षांची ही गोष्ट आहे. जेव्हा हा राज्य महामार्ग झाला असेल त्यावेळी चिंधी चक ते सावरगाव दरम्यान या आम्रवृक्षांची लागवड करण्यात आली. आज हे आम्रवृक्ष मोठे झाले. या वृक्षांचा विस्तार लक्षात घेतल्यास किमान ५० ते ६० वर्षांचे नक्कीच असावे आहे. या काळात वृक्षांनी हजारो नागरिक तसेच उन्हातान्हातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना मायेची सावली आहे. मोठे झाड आणि त्यातही आंब्याचे म्हणून अनेकांनी या झाडाखाली आपली वाहने थांबवून क्षणभर विसावा घेत होते. या वृक्षांच्या फळांचा गोडवा चाखला. तृप्तीची ढेकरही दिली आहे. पण हेच वृक्ष आज काळाला नकोशी झाली आहेत. काळाची गरज म्हणून या वृक्षांवर कुºहाड चालविण्यात आली.
नागभीड - सिंदेवाही या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आहे.चिंधी चक ते सावरगाव दरम्यान किमान ६० ते ७० च्या संख्येत ही वृक्ष आहेत.रस्ता रूंदीकरणाची गरज म्हणून हे वृक्ष तोडणे गरजेचे आहे. या वृक्षांची तोडही सुरू करण्यात आली. ही वृक्षतोड सुरू असताना राज्य महामार्गाने प्रवास करणारे प्रवासी हळहळ व्यक्त करीत होते. एक झाड लावायला आणि ते मोठे करायला कितीतरी वर्र्षे वाट पाहावे लागते. पण, हे विशालकाय वृक्ष काही मिनिटांत नष्ट झाले. त्यामुळे अनेकांच्या मनात गहिवर दाटून आला होता.

Web Title: The ax on 60 year old mango tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.