शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारास अटक करा

By admin | Updated: December 22, 2016 01:57 IST

येथील धान्य व्यापारी व कपडा व्यापारी नंदकिशोर सारडा यांना धमकी देवून ५० हजाराची खंडणी मागणारा सचिन मुळेवार जेरबंद झाला.

सावली येथील प्रकरण : पकडलेल्या आरोपीला पोलीस कोठडी सावली : येथील धान्य व्यापारी व कपडा व्यापारी नंदकिशोर सारडा यांना धमकी देवून ५० हजाराची खंडणी मागणारा सचिन मुळेवार जेरबंद झाला. पण या टोळीचा मुख्य सुत्रधार व ज्याच्याकडे सर्व माहिती गोळा करण्याची जबाबदारी असते, तो ढगल्या नावाचा व्यक्ती मोकाट असल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे. अमोल मुळेवार हा टोळीचा सदस्य आहे. म्होरक्या कोण हे सर्वांना माहित आहे. तेव्हा ठाणेदारांनी अमोल मुळेवारला बोलते केल्यास संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होवू शकतो. त्यामुळे सुत्रधाराला अटक करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या एक-दोन वर्षापासून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून मिरविणारा एक घरजावई म्हणून आलेला युवक सावलीच्या तरुण मुलांना हाताशी धरुन खंडणी, ब्लॅकमेल, माहिती अधिकाराचा धाक दाखवून आपली टोळी बनविण्यात यशस्वी ठरला. नगर पंचायत प्रभाग १६ मधील निवडणुकीतील उमेदवाराचा फोन टेपिंग याच टोळीने करून पैशाची मागणी केली. आडेपवार अतिक्रमण प्रकरण, आनंद बेजगमवार धमकी प्रकरण, गहू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचे प्रकरण, दारू विक्रेते, ठेकेदार धमकी प्रकरण याच टोळीने घडवून आणले. सदर प्रकार सारडा यांच्या धाडसीपणामुळे व ठाणेदार धुळे यांच्या चानाक्ष बुद्धीने या टोळीचा एक सदस्य गजाआड झाला. बाकीचे बाहेर भटकत आहेत. या टोळीने मुलच्या शिक्षकाच्या घरासमोरील अतिक्रमणाचा मुद्दासुद्धा खंडणी घेऊन सोडविला होता. त्यामुळे या टोळीचे मनोबल वाढले असल्याने जेथे पैसे मिळतात तिथे हात व धाक दाखवून खंडणी गोळा करायची व कोणतेही प्रामाणिक व मेहनती कामे न करता जीवन जगण्याचा फार्मूला या टोळीने शहरात निर्माण केला आहे. त्यामुळे युवक मंडळी बिना त्रासाचे व सहज सोपे काम म्हणून या टोळीत सहभागी होत आहेत. या संपूर्ण टोळीला अटक केल्याशिवाय खंडणीसारखे ग्रामीण भागात होेणारे प्रकार संपुष्टात येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून मुख्य सुत्रधारास अटक करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)