शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र १०० वरून आता ५०० हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

धान उत्पादनासाठी प्रसिद्ध चंदपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात कापूस, सोयाबीन तसेच इतर पारंपरिक पीक घेतल्या जाते. यातून शेतकऱ्यांना पाहिजे तसा नफा मिळत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन  अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान, पीक पद्धतीत बदल घडवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. 

ठळक मुद्देपारंपरिक पिकांना फाटा

साइईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा, पारंपरिक पीक पद्धतीमधून शेतकऱ्यांना  होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषदेने पीकपद्धतीत मोठे बदल घडवून आणताना हळद पिकासाठी प्रोत्साहन दिले आहे. जिल्ह्यात १७४ शेतकऱ्यांनी १०० हेक्टरवर हळदीचे पीक घेतले. दरम्यान,  उत्पादन भरघोस आले. शिवाय, उत्तम दर्जाची हळद पिकविण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले. त्यामुळे यंदा ५०० हेक्टरपर्यंत हळदीचे पीक क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. धान उत्पादनासाठी प्रसिद्ध चंदपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात कापूस, सोयाबीन तसेच इतर पारंपरिक पीक घेतल्या जाते. यातून शेतकऱ्यांना पाहिजे तसा नफा मिळत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन  अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान, पीक पद्धतीत बदल घडवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. कृषी अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हळद पिकाची निवड केली. जिल्हा परिषद कृषी विभागाने वार्षिक योजना, नाविन्यपूर्ण योजनेतून बियाणांसाठी अनुदान दिले. कृषी विभागाकडून हळद बियाणांसाठी अर्ज मागविण्यात आले. वरोरा, भद्रावती, चिमूर, कोरपना व मूल येथील १७४ शेतकऱ्यांनी हळद लागवडीची तयारी दर्शविली. प्रशासनाने त्यांना आवश्यक उपकरण, बियाणे यासाठी अनुदान दिले. शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हळद पिकविल्याने हा प्रयोग यशस्वी झाला. 

जंगलव्याप्त क्षेत्रात फायदेशीर जंगलव्याप्त क्षेत्रात शेतीचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. धान, सोयाबीन, कापसाचेही हे प्राणी नुकसान करतात. दिवसरात्र मेहनत करून फुलविलेली शेती एका रात्रीतून वन्यप्राणी उद्ध्वस्त करतात. त्या तुलनेत हळदीच्या पिकाचे नुकसान कमी आहे. जंगलव्याप्त क्षेत्रासाठी हे पीक फायदेशीर ठरू शकते.  

कमी कालावधीतील नगदी पीक हळद पीक कमी कालावधीमध्ये हातात येणारे नगदी पीक आहे. आहार, औषधनिर्मिती, सौंदर्य प्रसाधने आणि धार्मिक विधीसाठी हळदीचा वापर होताे.

हळद पिकाची जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन तसेच पारंपरिक पिकांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी हळद पिकाचा पर्याय समोर आला. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावर्षी पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. पुढील काळात हळद क्षेत्र वाढविण्यासाठी भर असेल. - राहुल कर्डिले,मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.

टॅग्स :agricultureशेती