१७ जागेसाठी १६६ उमेदवांराचे अर्ज

By Admin | Updated: December 23, 2014 23:00 IST2014-12-23T23:00:58+5:302014-12-23T23:00:58+5:30

नव्यानेच स्थापन झालेल्या गडचांदूर नगर परिषदेची पहिली निवडणूक १८ जानेवारी रोजी होणार आहे. १७ जागेसाठी तब्बल १६६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर केले. मंगळवारी उमेदवारी

Application for 166 candidates for 17 seats | १७ जागेसाठी १६६ उमेदवांराचे अर्ज

१७ जागेसाठी १६६ उमेदवांराचे अर्ज

गडचांदूर नगर परिषद निवडणूक : राजकीय हालचालींना आला वेग
गडचांदूर : नव्यानेच स्थापन झालेल्या गडचांदूर नगर परिषदेची पहिली निवडणूक १८ जानेवारी रोजी होणार आहे. १७ जागेसाठी तब्बल १६६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर केले. मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असल्याने येथे उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे, सायंकाळी उशिरापर्यंत उमेदारांचे अर्ज स्विकारणे सुरु होते.
नगर परिषदमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सक्रीय झाले आहे. १७ जागेसाठी १६६ उमेदवारांनी अर्ज सादर केल्याने नगर परिषद निवडणुकीच चांगलीच रंगत राहणार आहे. बुधवारी अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज वापस घेतल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Application for 166 candidates for 17 seats