शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

‘आॅनलाईन’मध्ये अडकल्या अंगणवाडीताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:21 IST

जिल्ह्यातील गावागावांत अंगणवाडी सेविका बालकांच्या गळी मराठी उतरविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत. शासन मात्र या अंगणवाडी सेविकांवर एकामागून एक कामांचा व्याप वाढवून त्यांना त्रस्त करून सोडत आहे. एवढेच नव्हे तर संगणक अज्ञान असलेल्या सेविकांवर आॅनलाईनचे ओझे टाकण्यात आले असून आता त्या आॅनलाईनमध्ये अकडल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.

ठळक मुद्देकामाचा व्याप वाढला : तुटपुंज्या मानधनात कसे करायचे काम ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील गावागावांत अंगणवाडी सेविका बालकांच्या गळी मराठी उतरविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत. शासन मात्र या अंगणवाडी सेविकांवर एकामागून एक कामांचा व्याप वाढवून त्यांना त्रस्त करून सोडत आहे. एवढेच नव्हे तर संगणक अज्ञान असलेल्या सेविकांवर आॅनलाईनचे ओझे टाकण्यात आले असून आता त्या आॅनलाईनमध्ये अकडल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरूवात बालवाडीपासून होते. म्हणूनच ग्रामीण भागात शिक्षणाचे उगमस्थान म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. शासनाने प्रत्येक गावी अंगणवाडी उघडून तेथे बालकांना धडे देण्यासाठी एक अंगणवाडी सेविका व एक मदतनीसांची नेमणूक केली आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीला रोखण्याची मोठी जबाबदारी या अंगणवाडी सेविकांवर आली आहे. मात्र आता अंगणवाडी सेविकांकडे इतर कामे मोठ्या प्रमाणात सोपविली जात आहे. त्यांच्याकडे गावाचे कुटुंब सर्वेक्षण मुलांची दैनंदिनी, गरोदर माता व स्तनदा मातांची नोंदणी, गावातील किशोरवयीन मुलींची नोंदणी, लसीकरण, गृहभेटी आदी कामे अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे. अंगणवाडीतील मुलांना सकस आहार बनूवन त्यांना खाऊ घालणे आणि गावातील स्तनदा व गरोदर मातांना सकस आहार धान्याचे वाटप करणे, ही कामेही करावी लागत आहे. एवढेच नव्हे, तर याच्या सर्व नोंदी आॅनलाईन नोंदावयाच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला एक भ्रमणध्वनी संच पुरविण्यात आला आहे. इंटरनेट खर्चासाठी प्रतिमाह ४०० रूपये देण्यात येत आहे. ही सर्व माहिती पाठविण्यासाठी एक अ‍ॅप देण्यात आले आहे. मात्र ही माहिती आॅनलाईन पाठविताना अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत आहे. बहुतांश अंगणवाडी सेविका वयस्कर व सातवी ते दहाविपर्यंत शिकलेल्या आहेत. त्यांना मोबाईलचे पाहिजे तेवढे ज्ञान नाही. त्यांना आॅनलाईन माहिती पाठविणे म्हणजे, अशक्यप्राय होत आहे. तसेच अनेक गावांमध्ये नेटची रेंजसुद्धा नसते, अशावेळी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.कधी अ‍ॅपचा सर्व्हर काम करीत नाही. कधी मोबाईल हाताळताना संपूर्ण डाटाच डिलीट होत आहे. अशावेळी मात्र या सेविकांची अतिशय घाबरगुंडीच उडत आहे.संगणक अज्ञानी असलेल्या बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांना मग एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी स्वत: जवळचे पैसे खर्च करावे लागतात. केवळ सात हजार रूपये मासिक तुटपुंजा मानधनातून हा आॅनलाईनचा खर्च त्यांना आर्थिक अडचणीत आणणारा ठरत आहे.आॅपरेटरची नेमणूक करावीअंगणवाडी केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयात एक तज्ज्ञ संगणक आॅपरेटर देण्याची गरज आहे. म्हणजे हा आॅपरेटर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना आॅनलाईनच्या कामात मदत करू शकतील. त्यामुळे सेविकेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका चिमुकल्यांना ज्ञानार्जनाचे काम करताना अनेक अडचणींचा सामना करतात. काही वेळा शासकीय अडचणी तर काहीवेळा गावातील राजकारण त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यातच मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने मागील काही वर्षांपासून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र या आंदोलनाला अद्यापपर्यंत यश आले नाही. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणात मानधन देण्यात येते, मात्र महाराष्ट्रात त्यांच्यावर अन्याय होत आहे.