शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे धडक

By admin | Updated: December 23, 2016 00:47 IST

अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

चंद्रपूर : अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी किमान वेतन देण्याची मागणी करण्यात आली. अ.भा. अंगणवाडी फेडरेशनच्या निर्णयानुसार खासदारांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना विश्रामगृहावर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रास्ताविक प्रा. दहिवडे यांनी केले. ना. अहीर यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. अंगणवाडी महिलांना किमान वेतन १८ हजार रुपये लागू करा, ४४ व्या श्रम संमेलनाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना सामाजिक सुरक्षा तसेच पेंशन देण्यात यावे, महागाई भत्ता लागू करण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. ना. अहिर म्हणाले की, अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांबाबत मला सहानुभूती आहे. सहा वर्षाचे कार्यकाळात केंद्र शासनाचे वतीने वाढ करण्यात आली नाही. ही एक चिंतेची बाब आहे. तुमचे रास्त प्रश्न आणि न्याय मागण्या मार्गी लावण्याचे दृष्टीने मी पुर्णत: प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी अंगणवाडी महिलांना दिले. पवित्रा ताकसांडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शोभा बोगावार, रेखा ढेंगळे, शारदा लेनगुरे, गुजाबाई डोंगे, संगीता देशमुख, मंजुषा ठाकरे, रत्नमाला वाघमारे, विजया महावादीवार, वर्षा बल्की, विमल जेनेकर, आशा नाखले, राधा सुंकरवार यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)