शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

तालुक्यातील मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी शहिद बाबुराव शेडमाके चौकातून दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात केली. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. दरम्यान, केंद्र्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा कायदा धार्मिक दुही निर्माण करणारा असून संविधानातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देविविध संघटनांचा सहभाग : तहसीलदाराला मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : केंद्र्र शासनाने मंजूर केलेला भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायदा धार्मिक विभाजन करणारा असल्याचे आरोप करून भारतीय मुस्लिम परीषद, बहुजन समाज व अन्य संघटनांनी बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. महेबूब भाई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसीलदाराला निवेदन सादर करण्यात आले.तालुक्यातील मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी शहिद बाबुराव शेडमाके चौकातून दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात केली. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. दरम्यान, केंद्र्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा कायदा धार्मिक दुही निर्माण करणारा असून संविधानातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहिद बाबूराव शेडमाके चौकात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवून हा कायदा मागे घेण्याची मागणी केली. मोर्चात महेबुब अली शेख, अजगरअली शेख, भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष जमालूद्दीन शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकाबंळे, शब्बीर जागिरदार, प्रा. लक्ष्मण मंगाम, डॉ. अंकुश गोतावळे, रशिद शेख, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशपाक शेख, किसन लव्हराळे, नगरसेवक रशीद अली, सत्तार शेख ,गफ्फार शेख, लाला शेख, आरीफ शेख, कलीम शेख, मुन्ना शेख, रसुल शेख, सलीम सय्यद, सलीम शेख,जबार शेख ,जबार कुरेशी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.मोर्चाच्या यशस्वीतेसाठी जमालूदीन शेख, अजगरअली शेख, शब्बीर जागीरदार, सत्तार शेख व शहरातील विविध संघटनांनी सहकार्य केले.भद्रावतीत संविधान बचाव रॅलीभद्रावती : सुधारीत नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यासाठी विविध संघटनांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी १ वाजता संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वामी मंदिराच्या प्रांगणातून ही रॅली काढण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी संघटना, बीआरएसपी, बीएसपी, आरपीआय, भाकपा, राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती, आदिवासी संघटना, गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, विमुक्त जनजाती विकास आदी संघटना रॅलीचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कुशल मेश्राम, राजू देवगडे, मुनाज शेख, हाजी जाकीर, भगतसिंग मालुसरे, भास्कर ताजणे, सुधाकर रोहणकर, रत्नाकर साठे, राजू गैनवार, हाजी जावेद शेख, बशीर भाई आदींनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चा