शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या मृत्यूनंतर जमावाकडून तोडफोड

By admin | Updated: October 18, 2015 00:59 IST

तालुक्यातील परसोडी येथील गिरीधर गुलाब गोवरकर (२२) याला शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, शेतात विषारी सापाने दंश केला.

पोलिसांचा लाठीचार्ज : डॉक्टरांचे दुर्लक्षब्रह्पुरी : तालुक्यातील परसोडी येथील गिरीधर गुलाब गोवरकर (२२) याला शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, शेतात विषारी सापाने दंश केला. या घटनेनंतर त्याच्या एका मित्राने सायकलीने त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. परंतु त्याच्यावर योग्य उपचार न झाल्याने प्रकृती गंभीर होत गेली व त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना गावकऱ्यांना माहिती होताच, संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन दगडफेक व तोडफोड केली. या घटनेने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु जमाव शांत होत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागलाय यात रुग्णालयाचा सफाई कामगार विलास लक्ष्मण वैलधरे (३०) हा जखमी झाला. याप्रकरणी गावकऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे.ग्रामीण रुग्णालयात प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकाऱ्याच्या भरवशावर हे रुग्णालय सुरू असल्याने व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्याने ग्रामीण रुग्णालयात सेवेसाठी वेळ देत नाहीत. पोलिसांनी हारून शेख याला अकारण मारहाण केली. पंकज खरकाटे याला ताब्यात घेतले. परंतु हे दोन्ही युवक स्थानिक रहिवासी असून दगडफेकीशी व तोडफोडीशी याचा कुठलाही संबंध नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दवाखान्यात काय झाले हे बघण्यासाठी स्थानिक रहिवासी आले असता पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीचार्ज केल्याने पोलिसांप्रती येथे रोष आहे. (तालुका प्रतिनिधी)