शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

तब्बल १२ तासांनी येतील निकाल हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:06 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरूवात होणार असली तरी सहाही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. निकालासाठी कमीत कमी १२ तासांची वाट पहावी लागणार आहे, असे संकेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : लोकसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरूवात होणार असली तरी सहाही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. निकालासाठी कमीत कमी १२ तासांची वाट पहावी लागणार आहे, असे संकेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिली. या मतमोजणीसाठी सहाही विधानसभानिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून ३२८ अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावणार आहेत. २५ ते ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. एक फेरी ३० ते ४० मिनिटांची असेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.११ एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाच्या दिर्घ कालावधीनंतर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन चंद्रपूरजवळच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सिलबंद ठेवल्या असून २३ मे रोजी सकाळी ७ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत गोदाम उघडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकारपरिषदेत दिली.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये १४ टेबल राहणार आहे. याकरिता ३२८ कर्मचारी व प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणीच्या सुक्ष्म निरीक्षणासाठी, मतमोजणी प्रक्रियेची अचुकता तपासण्यासाठी व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक हॉलकरिता अतिरिक्त सूक्ष्म निरीक्षक देण्यात येणार आहे. तसेच निकाल अचुक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना १७ सी भाग २ च्या आकडेवारीशी तपासून अचुक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांसोबत तपासून समिक्षा करून घेतील. जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. या सर्व बाबींची वेळोवेळी पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. खेमनार यांनी दिली. सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपरपासून मोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठया मोजल्या जाणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठयांची मोजणी प्रत्येक मतदार संघातील प्रातिनिधीक निवड पध्दतीने केली जाणार आहे.नागरिकांसाठी १०० मीटर अंतरावर व्यवस्थानागरिकांसाठी २३ तारखेला मतमोजणी परिसरात शंभर मीटर अंतरावर जिल्हा प्रशासनाने थांबण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी लाऊडस्पिकरवर माहिती मिळणार आहे. शंभर मीटरच्या आतमध्ये कोणत्याही वाहनाला व नागरिकांना प्रवेश नाही. मतमोजणी कर्मचारी, जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रवेशिका असणारे कर्मचारी, अनुषंगिक कामगार, निवडणूक आयोगाचे विशेष प्रवेश पत्र असणारे पत्रकार यांनाच फक्त प्रवेश आहे. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण निवडणूक आयोगामार्फत करण्यात येणार आहे. यावेळेस प्रथमच व्हीव्हीपॅट मशीन व त्यातील चिठ्ठयांची मोजणीदेखील होणार असल्यामुळे दरवेळीपेक्षा निकालाला अधिक वेळ लागू शकतो, अशी शक्यता जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी व्यक्त केली आहे.३२८ कर्मचारी कामालामतमोजणी ही प्रक्रिया अतिशय कडक बंदोबस्तात वखार महामंडळातच सुरु होणार असून या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र दलाच्या तुकडीकडे या स्थळाची सुरक्षा व्यवस्था असून या ठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश निषिध्द आहे. प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेमध्ये मतमोजणी सहायक, मतमोजणी पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक अशा ३२८ कर्मचाºयांचा सहभाग आहे. परिसरात पाचशे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.निरीक्षकांनी केली पाहणीनिवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने निरीक्षकांची नेमणूक केली आहे. चंद्रपूरमध्ये दिपांकर सिन्हा व जे.पी.पाठक हे वरिष्ठ सनदी अधिकारी निरीक्षक म्हणून दाखल झाले आहे. ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट ठेवण्यात आलेल्या बंद गोदामाची त्याच पुढे गोदामामध्ये निर्माण करण्यात आलेली मतमोजणी यंत्रणेची निरीक्षकांनी आज पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यावेळी त्यांच्यासोबत होते.