शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने दिशाभूल केली - नरेश पुगलिया

By admin | Updated: February 4, 2016 00:59 IST

या संदर्भात माहिती देण्यासाठी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले,....

या संदर्भात माहिती देण्यासाठी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले, स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळण्याच्या संदर्भात प्रशासनाने घेतलेली भूमिका दिशाभूल करणारी आहे. या स्मशानभूमीवर मंगळवारी प्रेत जाळण्याच्या पूर्वी प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती. एकीकडे कार्यकर्ते, नागरिक यांना बैठकीत गुंतवून ठेवून जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात आणि दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून पे्रत जाळण्याची प्रक्रिया पार पाडली. प्रशासनाची आणि पोलिसांची ही कृती दिशाभूल करणारी असून जनतेच्या धार्मिक भावना पायदळी तुडविणारी आहे, असे ते म्हणाले.पुगलिया पुढे म्हणाले, १९९९ च्या काळात इरई नदीच्या पात्रात प्रेत जाळण्याची प्रथा होती. पर्यावरणाला धोका असल्याने आपण आपल्या खासदार फंडातून ही स्मशानभूमी बांधली. महसूल विभागाने ३० आर जागा दिली, त्यावर तीन शेड बांधण्यात आले. आमदार फंडातून भींतही बांधण्यात आली. ही स्मशानभूमी दाताळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली. मात्र पाणी आणि वीज बिलाचा खर्च परवडत नसल्याने ग्रामपंचायतीने नकार दिला. त्यामुळे अडवानी, हसानी यांना देखभाल दुरूस्तीच्या खर्चासह ती चालविण्यास दिली. नंतरच्या काळात लाकडाचे कोठार बांधण्यात आले. मात्र कालांतराने ही स्मशानभूमी बंद पडली. त्यात झुडूपे वाढली. दाताळाच्या नागरिकांनीही येथे वापर बंद केला. नंतरच्या काळात या परिसरात अन्य मंदीरासह बालाजींचे मंदीर बांधकाम सुरू झाले. तेव्हापासून सर्व नागरिकांनी मोक्षधामवर प्रेत जाळणे सुरू केले. ग्रामपंचायतीने ही जागा बालोद्यानसाठी देण्याचा ठराव घेवून प्रशासनाला पाठविला. स्मशानभूमीला कुलूप लावून बंदचा फलकही लावण्यात आला होता. असे असतानाही केवळ एकाच कुटूंबाने आपल्या घरातील व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीचा वापर सुरू केला. मंगळवारची घटनाही त्यातूनच घडली आहे. नगरसेवक डोडाणी यांच्यामागे राजकीय पाठबळ असल्यानेच हा प्रकार जाणीवपूर्वक घडला, मात्र त्यातून नागरिकांच्या भावना दुखविण्यात आल्याचे पुगलिया म्हणाले. ही स्मशानभूमी कुण्या एका समाजाला कधीच नव्हती, जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या मागे फिरण्यापेक्षा वस्तुस्थिती तपासावी, आही टोला पुगलियांनी लगावला. पत्रकार परिषदेला राहूल पुगलिया, अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, प्रशांत दानव, वसंत मांढरे, गावंडे गुरूजी, माजी नगराध्यक्ष डॉ. महाकूलकर आदी उपस्थित होते.