शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारांच्या कारवाईने दारुविक्रीला लगाम

By admin | Updated: October 7, 2016 01:14 IST

दुर्गापूर गावात अवैधपणे विक्री होणाऱ्या ताडी व दारुमुळे युवकाला प्राण गमवावा लागला.

दुर्गापूर पोलीस ठाणे : अवैध व्यवसायही पाडले बंद दुर्गापूर : दुर्गापूर गावात अवैधपणे विक्री होणाऱ्या ताडी व दारुमुळे युवकाला प्राण गमवावा लागला. तर कित्येकांचे संसार उद्धवस्त झाल्याच्या घटना ताज्या आहेत. एवढ्यातच दुर्गापूर ठाण्यात रुजू झालेल्या ठाणेदारांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत अशा अवैध दारु व ताडी विक्रीवर लगाम लावल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दुर्गापूर गावात सुरुवातीला छोटेखाणी पोलीस चौक होती. त्यावेळेस येथे गंभीर गुन्ह्याचे प्रमाण सातत्याने वाढतच होते. परिणामी या चौकीचे पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. त्यामुळे काही अंशी अशा गंभीर गुन्ह्यावर चाप बसला. मात्र अवैध व्यवसाय फोफावलेलेच होते. या अवैध व्यवसायांपैकी २४ तास राजरोसपणे ठिकठिकाणी मिळणारी दारु व ताडीमुळे येथील अनेक युवक व्यसनाच्या अधीन झाले होते. यापैकी क्लोरोफार्म नवसागर, सॅक्रीन पासून बनविलेल्या कृत्रिम ताडीचा तर येथील युवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडत होता. या विषारी ताडीच्या प्राशनाने येथील चार युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येकाचे संसार उद्धवस्त झाले व काही संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होते. हे एक कटू सत्य होते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. कित्येक लोकांच्या अशा तक्रारीही होत्या. २००९ ते जुलै २०१५ पर्यंत ताडी विक्रेत्यांवर १९ गुन्हे दाखल करून पोलीस कारवाई करण्यात आली. मात्र ताडी विक्रेत्यांनी सर्रास ताडीची विक्री करून लोकांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा गोरखधंदा सुरुच ठेवला होता.मात्र सप्टेंबर २०१५ मध्ये दुर्गापूरात नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार आर. के. सिंगनजुडे यांनी दखल घेत एका महिन्यात ताडीचे दुकान बंद केले. त्यानंतर थेट ताडोबा मार्गावर त्याच दुकानातून अवैध दारु विक्री सुरू झाली. त्यावरही कारवाई करीत एका वर्षात १५ गुन्हे दाखल केले. याशिवाय अगदी ताडोबा मार्गावर आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाच्या वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट पुढे खुलेआम दारु विक्री करणाऱ्या महिलेवर अनेकदा पोलीस कारवाई तिलाही दारुविक्री बंद करण्यात ठाणेदारांनी भाग पाडले. त्यामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)