शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा, लुटमार व चिटफंडसारख्या अवैध कंपन्यांवर कारवाई करावी

By admin | Updated: November 19, 2015 01:26 IST

चंद्रपूर येथे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक जेव्हापासून रुजू झालेत तेव्हापासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खून, चोऱ्या, व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे.

चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन चंद्रपूर : चंद्रपूर येथे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक जेव्हापासून रुजू झालेत तेव्हापासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खून, चोऱ्या, व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. या घटनांवर वेळीच आळा घालून चिटफंडसारख्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनातून केली आहे. दुचाकी वाहनावर स्वार महिलांचे मंगळसुत्र व चेन लुटणारे वडगाव प्रभाग तसेच साईबाबा वार्ड, स्नेहनगर, हवेली गार्डन या ठिकाणी वावर आहग. मागील महिन्यात सात ते आठ ठिकाणी घरफोड्या झाल्यात आणि स्टेडियम रोडला दुचाकीस्वारांनी तीन महिलांचे मंगळसुत्र ओढून नेले आणि राष्ट्रवादी नगर, तुलसीनगर येथील रहिवासी नारायण भानारकर व पुंडलिक कुंभारे यांच्या येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज पळविला. त्यांच्या येथे दरोड्यांचा खेळ तब्बल पाऊण तास चालला. पोलिसांना फोन करुनही तब्बल एक तासापर्यंत कोणीच घटनास्थळी आले नाही. जर पोलीस प्रशासन सर्तक असते तर हे दरोडेखोर आपल्या जाळ्यात अडकले असते. यानंतर असे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने सर्तक रहावे व पोलीस गस्त वाढविण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.शहरातील वाहतुक नियंत्रण शाखेकडून सध्या चंद्रपूर शहरातील वाहतूक सुरळीत होत नाही आहे. त्यामुळे शहरामध्ये जागोजागी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी अशी सूचना वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात यावी व जागोजागी रस्त्यावर होणारे अतिक्रमण थांबविण्यात यावे, असेही म्हटले आहे.चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे चंद्रपूर शहरामध्ये जवळजवळ ३० कंपन्यामार्फत सर्वसामान्य जनतेकडून १०० कोटी चिट फंडच्या नावावरती पैसा गोळा करीत असल्याची तक्रार दिली होती. परंतु अजूनही त्या कंपन्यांवर निर्बंध टाकण्यात आलेले नाही व कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लुट अजूनही सुरू आहे. त्यामुळे चिटफंड कंपन्यांवर गुन्हे नोंद करुन कारवाई करण्यात यावी तसेच तस्करांना सहकार्य करणाऱ्या खनिकर्म अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे नंदु नागरकर, सुनीता लोढीया, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर यांनी निवेदनातून केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)