घुग्घुस : परिसरात रेती उत्खनन व तस्करीप्रकरण गाजत असतानाच एसीसी परिसरातील व्हाईट हाऊसनजिक ३० ब्रॉस अवैध रेती जप्त केली. जप्त केलेली रेती मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आला आहे. मंडळ अधिकारी किशोर नवले व तलाठी दिलीप पिलाई यांनी मागील आठवड्यात गावानजीक एसीसी परिसरातील व्हाईट हाऊसनजिक फेरफटका मारला असता रेतीचा ३० ब्राॅस अवैध रेती साठा आढळला. हा रेतीसाठा करून मंडळ व तलाठी कार्यालय परिसरात ठेवण्यात आला. पुढील तपास महसूल विभाग करीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}