संजय गांधी योजनेच्या पहिल्याच सभेत ९४ प्रकरणांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST2021-02-18T04:52:20+5:302021-02-18T04:52:20+5:30

यात श्रावण बाळ व वृद्धापकाळ योजनेच्या ५३ तर संजय गांधी योजनेच्या ४१ लाभार्थींचा समावेश आहे. यावेळी समितीचे सदस्य दशरथ ...

94 cases approved in the first meeting of Sanjay Gandhi Yojana | संजय गांधी योजनेच्या पहिल्याच सभेत ९४ प्रकरणांना मंजुरी

संजय गांधी योजनेच्या पहिल्याच सभेत ९४ प्रकरणांना मंजुरी

यात श्रावण बाळ व वृद्धापकाळ योजनेच्या ५३ तर संजय गांधी योजनेच्या ४१ लाभार्थींचा समावेश आहे. यावेळी समितीचे सदस्य दशरथ वाकूडकर, संजय गेडाम, सुनील शेंडे, सोनल मडावी, सत्यनारायण अमर्दुतीवार, रूपाली संतोषवार, अर्चना चावरे, सदस्य सचिव म्हणून नायब तहसीलदार यशवंत पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान, संजय गांधी, वृद्धापकाळ, श्रावणबाळ गरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत करणारी योजना असून, अगदी कमी कागदपत्रे लागत असतात; मात्र काही दलाल गरीब लोकांना आर्थिक शोषण करताना दिसत आहेत. यापुढे दलालाची गय केली जाणार नाही व गरजुंना समितीचे सदस्य विशेष लक्ष घालून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी सांगितले.

Web Title: 94 cases approved in the first meeting of Sanjay Gandhi Yojana