जिल्ह्यात ८३ हजार १७० रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST2021-07-14T05:00:00+5:302021-07-14T05:00:34+5:30

मंगळवारी जिल्ह्यात बाधित आढळलेल्या ११ रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २, ब्रह्मपुरी १, बल्लारपूर २, वरोरा १, कोरपना १ व जिवती तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर तालुका, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८४७ वर पोहोचली आहे. सध्या १४४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

83 thousand 170 patients in the district free from corona | जिल्ह्यात ८३ हजार १७० रूग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ८३ हजार १७० रूग्ण कोरोनामुक्त

ठळक मुद्दे११ नवे रूग्ण : मृतांची संख्या शुन्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर आला आहे. दिवसेंदिवस सक्रीय रूग्णांची संख्याही कमी होत आहे. गत २४ तासात जिल्ह्यात १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी देण्यात आली. ११ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत ८३ हजार १७० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मंगळवारी जिल्ह्यात बाधित आढळलेल्या ११ रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २, ब्रह्मपुरी १, बल्लारपूर २, वरोरा १, कोरपना १ व जिवती तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर तालुका, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८४७ वर पोहोचली आहे. सध्या १४४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ८३ हजार २६५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ९४ हजार ९२५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे मास्क वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी व पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 83 thousand 170 patients in the district free from corona