उपचारांनंतर ८१ हजार ११९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:56+5:302021-06-10T04:19:56+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ८७७ वर पोहोचली आहे. सध्या १ हजार २७० बाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

81 thousand 119 corona free after treatment | उपचारांनंतर ८१ हजार ११९ कोरोनामुक्त

उपचारांनंतर ८१ हजार ११९ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ८७७ वर पोहोचली आहे. सध्या १ हजार २७० बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ५ लाख २ हजार ५७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख १५ हजार ६४९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १४८८ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३७७, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ४०, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखावे. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपुरात २८ रुग्ण आढळले

बाधित आलेल्या १२२ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा २८, चंद्रपूर तालुका ७, बल्लारपूर २१, भद्रावती ९, ब्रह्मपुरी २, नागभीड १०, सिंदेवाही ४, मूल ८, सावली ६, पोंभूर्णा ३, गोंडपिपरी ६, राजुरा २, चिमूर ३, वरोरा ६, कोरपना ५ आणि जिवती येथील दोघांचा समावेश आहे.

Web Title: 81 thousand 119 corona free after treatment