शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस येथे ६० टन कोळसाची अफरातफर

By admin | Updated: February 27, 2015 00:51 IST

वेकोलिच्या कोळसा खाणीतून बुटीबोरीच्या दोन वेगवेगळ्या कारखान्यात कोळसा वाहतुक करणाऱ्या चार ट्रक चालकाने कोळसा कारखान्यात न पोहचविता ...

घुग्घुस : वेकोलिच्या कोळसा खाणीतून बुटीबोरीच्या दोन वेगवेगळ्या कारखान्यात कोळसा वाहतुक करणाऱ्या चार ट्रक चालकाने कोळसा कारखान्यात न पोहचविता कोळसा खोट्या पावत्या बनवून ४० टन कोळशाची अफरातफर केल्याचा तक्रारीवरुन चार ट्रक चालकाला घुग्घुस पोलिसांनी अटक केली आहे.अनिल चौधरी (रा. वांढरी),, शंकर शेंडे (यशवंत नगर पडोली), अंकुश सिडाम, राजेश यादव (घुग्घुस) तर ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुपरवायझर जयवंत पाइकवार, विद्या टॉकीज घुग्घुस व इरफान शमीम शेख इंदिरानगर घुग्घुस असे अटक केलेल्या चालकाची नावे आहेत. या प्रकरणाचे पोलिसांनी खोलवर तपास केल्यास मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपींना २ तारखेपर्यंत पीसीआर मिळाला आहे.वेकोलि वणी क्षेत्राच्या नायगाव कोळसा खाणीतून बुटीबोरीच्या विदर्भ इंडस्ट्रीज पावर कंपनीला कोळसा ट्रक क्र.एम.एच ३४ एम. ९१३६, एमएच ३४ ई- १२ भरुन चालक निघाले. मात्र कोळसा बुटीबोरी कंपनीत कोळसा खाली न करता खोट्या रसिदा बनवून अन्य ठिकाणी खाली केला. त्यामुळे अफरातफर केल्याचा प्रकार ९ ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान उघडकीस आला. सपा ट्रान्सपोर्टच्या सुपरवायझर रुपेश जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारी वरुन दोन्ही ट्रक चालकाला घुग्घुस पोलिसांनी अटक केली.मंगळवारी रात्री निलजाई कोळसा खाणीतून इंडस्ट्रीज बुटीबोरीला कोळसा भरुन निघालेल्या दोन ट्रक चालकांनी संगणमताने ४० टन कोळशाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार कोळसा वाहतुक करणाऱ्या ट्रान्सपोर्टर सतीश देवतळे यांच्या लक्षात येताच, घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या दोन्ही ट्रक चालकाला व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जयवंत पाइकवार व इरफान शमीम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी ठाणेदार मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे, पोलीस उपनिरीक्षक मुंडे तपास करीत आहे. या प्रकरणात बुटीबोरी कंपनीचे काही अधिकारी अडकण्याची शक्यता असून कोळसा अफरातफरीत सहभागी मोठे मासे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)