शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

५९ जणांना जेलची हवा

By admin | Updated: March 8, 2015 00:33 IST

होळीनिमित्त जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्यानंतरही अनेकांनी वाहतुकीची नियम तोडले. एवढेच नाही तर, काहींनी मनसोक्त मद्यप्राशन करून होळी साजरी केली.

चंद्रपूर: होळीनिमित्त जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्यानंतरही अनेकांनी वाहतुकीची नियम तोडले. एवढेच नाही तर, काहींनी मनसोक्त मद्यप्राशन करून होळी साजरी केली. अशा ४२ मद्यपी तसेच १७ दारुविक्रेत्यांना पोलिसांनी जेलची हवा दाखविली. तर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ८४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलिसी हिसक्यामुळे अनेकांनी अवैधमार्गाने दारुची विक्री टाळली. १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने काहींनी होळीपासून दारु न पिण्याचा संकल्प केला आहे.जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात आली. काहींनी शहराबाहेर तर काहींनी मित्रमैत्रिनींसोबत हा सण साजरा केला. मागील वर्षी होळीच्या दिवशी अवैध मार्गाने मिळणारी दारू आणि भांडणामुळे अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. एवढेच नाही विविध अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. यात काहींना आपला जीव गमवावा लागला. अशा घटना जिल्ह्यात घडू नये यासाठी यावर्षी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी विशेष काळजी घेत सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. एवढेच नाही तर प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना शासकीय वाहन उपलब्ध करून देत चोख बंदोबस्त ठेवला. याचा चांगला परिणाम यावर्षी दिसून आला असून अपघात विरहीत होळी साजरी झाली.६ मार्चला दिवसभर पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर १७ जण अवैध मार्गाने दारू विकताना आढळून आले. या सर्वांना कोठडीत ठेवण्यात आले. तर दुचाकीवर ट्रीपलसिट नेणाऱ्या ८४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. यामध्ये ९ महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना पोलीस ठाण्यात दोन तास बसवून ठेवण्यात आले. (नगर प्रतिनिधी)