चंद्रपुरात ५०० ग्रॅम अफीम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:28+5:302021-09-07T04:34:28+5:30

मागील काही दिवसांपूर्वी रामनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून मधुकर गीते यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी ...

500 grams of opium seized in Chandrapur | चंद्रपुरात ५०० ग्रॅम अफीम जप्त

चंद्रपुरात ५०० ग्रॅम अफीम जप्त

Next

मागील काही दिवसांपूर्वी रामनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून मधुकर गीते यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, शनिवारी शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे गस्तीवर असताना देवेंद्रसिंग गिल याच्याकडे गुंगीकारक पदार्थ अफीम असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर त्याच्या घरी धाड टाकण्यात आली. यावेळी लाकडी पलंगाखाली ५० हजार रुपये किमतीचा ०.५०० किलोग्रॅम काळपट रंगाचा ओलसर पदार्थ अफीम आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करुन एन.डी.पी.एस कायदा १९८५ कलम ८ (क), १७ (ब) अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकरे, पोलीस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, नापोशि पुरूषोत्तम चिकाटे, किशारे वैरागडे, सिडाम, संजय चैधरी, विनोेद यादव, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, लालू यादव, विकास जुमनाके, संदीप कामडी, माजीद पठान, भावना रामटेके आदींनी केली.

Web Title: 500 grams of opium seized in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.