शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

क्रीडा संकुलसाठी देणार पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 9:58 PM

जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात याकरिता जिल्हा क्रीडा संकुल बांधकामासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार केली. टेबल टेनिस स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार: टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात याकरिता जिल्हा क्रीडा संकुल बांधकामासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार केली. टेबल टेनिस स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, डॉ. विजय इंगोले, महाराष्टÑ टेबल टेनिस असोसिशनचे सचिव प्रकाश तुरकुळे, अ‍ॅड. आशुतोष पोतनीस, प्रकाश जसानी, प्रा. वसंत आकुलवार, कुंदन नायडू, हर्षवधन सिंघवी, राजेश नायडू व अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडंूना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर संधी मिळावी, यासाठी उत्तम दर्जाचे प्रशिक्षण तसेच खेळाचे साहित्य देण्यासाठी रिलायन्स कंपनीचे प्रायोजकत्व मिळवून देणार आहे. बल्लारपूर येथे बांधण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी चित्रपट अभिनेते अमिर खान यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावारण निर्माण झाले. मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा येथेही दर्जेदार सुविधा निर्माण केले जात आहे. राज्य शासनाने क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे धोरण स्वीकारले. या धोरणानुसारच राज्यामध्ये क्रीडाक्षेत्रात पायाभूत कामे सुरुत आहेत असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. आ. श्यामकुळे यांनी स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करुन दिला. क्रीडा संकुलाच्या बांधकामासोबतच सोयीसुविधा निर्माण होणार आहेत. महापौर घोटेकर यांनीही एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा उल्लेख करुन जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत असल्याचे नमुद केले. जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी प्रास्ताविक भाषणातून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तालुका क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक, संजिवनी पूर्णपात्रे, आर. बी. वडते, पंडित चव्हाण, सचिन मांडवकर, राजेंद्र आव्हाड, वाल्मिक खोब्रागडे, विजय बागडे, संजय भरडकर, टेनिस संघटनेचे पदाधिकारी व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.