शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे ४५ टक्के वृक्ष नष्ट

By admin | Updated: February 5, 2015 23:05 IST

ग्लोबल वार्मिंगसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला असून ग्रामपंचायतींनी लावलेले केवळ ५४.६६ टक्के वृक्ष

मंगेश भांडेकर - चंद्रपूरग्लोबल वार्मिंगसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा पुरता फज्जा उडाला असून ग्रामपंचायतींनी लावलेले केवळ ५४.६६ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित सेना पथकाने तपासणी अहवालातून दिला आहे. या अहवालातून तिनशेच्यावर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. पर्यावरणीय संतुलन कायम राखून गावाचा शाश्वत विकास हा वृक्ष लागवड योजनेचा मूळ उद्देश होता. मात्र, योजनेच्या मुळ उद्देशालाच ग्रामपंचायतींनी हरताळ फासली आहे. ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड न करता तर काहींनी केवळ देखाव्यासाठी वृक्ष लागवड करुन निधीची उचल केली आहे. वृक्ष लागवड योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले. या उद्दिष्टाची पुर्तता करण्यासाठी रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, लावलेली वृक्ष जगविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे खड्डेच दिसतात वृक्ष मात्र गायब आहेत. ही बाब निदर्शनास येताच वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. २० नोव्हेंबर २०१४ ला रोहयो आयुक्तांनी पत्र पाठवून रोजगार हमी योजनेतून मागील तीन वर्षात ग्रामपंचायतस्तरावर करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. तपासणीसाठी जिल्ह्यातील १७१ राष्ट्रीय हरित सेना पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकांनी जिल्ह्यातील ७६१ पैकी २४९ ग्रामपंचायतीमधील ४२१ वृक्ष लागवड कामाची चौकशी केली. यात ४५.३४ टक्के वृक्ष नष्ट झाले. ७६१ ग्रामपंचायतींनी ७ लाख ९४ हजार ३९५ रोपांची लागवड केली. मात्र, प्रत्यक्षात ४ लाख ३४ हजार २१० रोपटेच जिवंत असल्याचे राष्ट्रीय हरित सेना पथकाच्या अहवालात म्हटले आहे.