२४ तासात २५ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:45+5:302020-12-31T04:28:45+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ...

25 corona positive in 24 hours | २४ तासात २५ कोरोना पॉझिटिव्ह

२४ तासात २५ कोरोना पॉझिटिव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर २५ बाधितांची नव्याने भर पडली. एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार २७१ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ४४७ झाली आहे. सध्या ४६० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७२ हजार ७३० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ४७ हजार ३७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये गडचिरोली शहरातील २१ दिवसांच्या बाळाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६४ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८ यवतमाळ आठ, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय रूग्ण

आज बाधित आलेल्या २५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तालुका दोन, बल्लारपुर एक, भद्रावती दोन, ब्रम्हपुरी एक, नागभीड एक, मूल एक, चिमूर तीन, वरोरा एक, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे, कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

Web Title: 25 corona positive in 24 hours