शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

२२३ कर्मचारी ठरले अज्ञानी

By admin | Updated: October 19, 2014 23:51 IST

प्रशासनामध्ये अनेक कामे करून फाईल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी आपले अज्ञात स्पष्ट केले आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील १ हजार ५१४ मतदार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल

चंद्र्रपूर : प्रशासनामध्ये अनेक कामे करून फाईल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी आपले अज्ञात स्पष्ट केले आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील १ हजार ५१४ मतदार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल २२३ कर्मचाऱ्यांनी अवैध मतदान केले आहे. यामुळे शिक्षीत असून आपला अज्ञानीपणा पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी दाखवून दिला आहे.१५ आॅक्टोबरला विधानसभेसाठी मतदान पार पडले. मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आपला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागाने कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची सोय करून दिली. यासाठी त्यांना बॅलेट कुपनही देण्यात आले. १ हजार ५१४ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील २६ कर्मचाऱ्यांच्या पसंतीत एकही उमेदवार नसल्याने त्यांनी नोटाचा वापर केला. तर १ हजार २९१ मतदारांनी विविध पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांना मतदान केले. २२३ कर्मचाऱ्यांनी मतदान करूनही चुकविल्याने त्याचे मतदान बाद झाले आहे.शासकीय कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या कर्मचाची शिक्षित आणि हुशार असतो. शासन त्यांची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारे करतात. मात्र एखाद्या अशिक्षित उमेदवारालाही लाजवेल अशी कामगीरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील २२३ कर्मचारी मतदारांनी केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क सायकल रॅली काढून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना विनंती केली. कर्मचाऱ्यांचे यासाठी अनेकवेळा प्र्रशिक्षणही झाले. तरीही तब्बल २२३ कर्मचाऱ्यांनी आपले अज्ञात दाखवून देत मतदानातून आपले मत बाद केले आहे.(नगर प्रतिनिधी)