शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

१८ दिव्यांग जोडपी अडकली साताजन्माच्या बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 6:00 AM

आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. गौरवबाबू पुगलिया संगणकीकृत उपवर-वधु सूचक केंद्र चंद्रपूरच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेले १८ दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाले. दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून आजतागायत दोनशेवर जोडप्यांचा विवाह या संस्थेने लावून दिला आहे.

ठळक मुद्देमंगलाष्टकाच्या साक्षीने विवाहबद्ध : राज्यभरातील जोडपी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रितीरिवाजाने झालेला हळदीचा कार्यक्रम, सांस्कृतिक मेजवानी आणि रविवारी महाकाली मंदिर येथून वाजतगाजत निघालेली वरात, लग्नमंडपात वºहाडयांची गर्दी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर, सनईचे सूर आणि मंगलाष्टकाच्या साक्षीने तब्बल १८ दिव्यांग जोडपी साताजन्माच्या गाठीत बांधले गेले.आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. गौरवबाबू पुगलिया संगणकीकृत उपवर-वधु सूचक केंद्र चंद्रपूरच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेले १८ दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाले. दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून आजतागायत दोनशेवर जोडप्यांचा विवाह या संस्थेने लावून दिला आहे. रविवारी आयोजित विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोेले, आमदार प्रतिभा धानोरकर, राहुल पुगलिया, श्याम पुगलिया, संजय देरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिंदे, अशोक ओस्तवाल, अनिल लुनिया, कीर्तिकुमार कटरे, जेसा मोटवानी, गजानन गावंडे, प्रशांत दानव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात १८ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी विवाहित नवदाम्पत्याना भेटवस्तू देण्यात आली. तर काही गरजू दिव्यांगांना शिलाई मशिन भेटरुपात देण्यात आली. जगप्रसिद्ध कला शिक्षक, प्रल्हाद ठक, अमित टिपले, गुरुदास राऊत, मृगेश गजबे, मनोज आणि वृशाल ब्राह्मणकर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.विवाह सोहळ्यासाठी श्याम पुगलिया, अरुण पुगलिया यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेतला होता. तर अशोक कोठारी, दिनेश चोरडिया, अमर गांधी, महेंद्र मंडलेचा, रतन गांधी, प्रकाश शहा, देवेंद्रभाई शहा, शैलेंद्र बैद, प्रवीण गोठी, राजेश जैन, अनुप खटोड, रेणू जैन यांनी सहकार्य केले. यावेळी आस्थाचे संजय पेचे, आशिष आक्केवार, महेश भगत, विनोद भोयर, यशवंत देशमाने, रोहित पुगलिया, विवेक पाटील, अमोल मारोतकर, प्रकाश राजूरकर, अविनाश गायधने आदींनी सहकार्य केले.प्रत्येकवेळी आस्थाच्या पाठिशी : पुगलियादिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, म्हणून आपण सदैव आस्थाच्या पाठिशी उभे राहू. दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्याची व्याप्ती वाढत असेल तर नक्कीच वाढू द्या. पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक दिव्यांग जोडप्यांचा विवाह लावून देण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.

टॅग्स :marriageलग्न