इटोली-गिलबिली मार्गावर १४० ताटवे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST2021-02-12T04:26:17+5:302021-02-12T04:26:17+5:30

बल्लारपूर वनविभागाची कारवाई बल्लारपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील इटोली-गिलबिली या मार्गावर अवैधरीत्या सरकारी वनातून बांबू कापून त्यापासून ताटवे तयार करून ...

140 trays seized on Itoli-Gilbili route | इटोली-गिलबिली मार्गावर १४० ताटवे जप्त

इटोली-गिलबिली मार्गावर १४० ताटवे जप्त

बल्लारपूर वनविभागाची कारवाई

बल्लारपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील इटोली-गिलबिली या मार्गावर अवैधरीत्या सरकारी वनातून बांबू कापून त्यापासून ताटवे तयार करून वाहतूक करीत असताना मेटॅडोर क्रमांक एमएच ३४ एम २४०४ ही गाडी वनखात्याने अडविली व त्यातील १४० ताटवे जप्त केले.

गोपनीय माहिती मिळताच मानोराचे क्षेत्र सहायक प्रवीण विरूटकर, वनरक्षक प्रवीण बिपटे, क्षेत्र सहायक उमरी यांनी सापळा रचून मेटॅडोर चालक आरोपी महेंद्र नामदेव राखुंडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर वाहनात १४० नग ताटवे विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून वाहन व वनोपज जप्त करून आरोपी महेंद्र नामदेव राखुंडे याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (१) ब अन्वये कारवाई करण्यात आली. सदर वनगुन्ह्याचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: 140 trays seized on Itoli-Gilbili route