शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील क्षेत्रावर १४ कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

तुकूम येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ घडलेल्या तीन चार वन्यप्राण्यांच्या हिंसक घटनांनी वन विभाग चांगलेच सतर्क झाले असून वन विभागाने संपूर्ण वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांच्या हिंसक कारवाया वाढल्या : वाघाच्या हल्ल्यांमुळे गावकरी भयभीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांनी गत पंधरवाड्यात सतत केलेल्या काही हिंसक कारवायांनी चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या भागात या घटना घडल्या, त्या संवेदनशील भागात १४ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय गस्तीच्या माध्यमातून १५ अधिकारी कर्मचारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.तुकूम येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ घडलेल्या तीन चार वन्यप्राण्यांच्या हिंसक घटनांनी वन विभाग चांगलेच सतर्क झाले असून वन विभागाने संपूर्ण वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली आहे.१८ जून रोजी तुकूम येथील एक शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यानंतर दोन तीन दिवसांनी बाम्हणी येथे एक वाघ चक्क घरात घुसला होता.या वृत्ताची शाई वाळत नाही तोच नवखळा येथे रानडुकराने गावात येऊन तीन गावकऱ्यांना जखमी केले. एवढेच नाही तर नवखळा आणि चिंधी माल याठिकाणीही वाघाच्या हल्ल्यात जनावरे ठार झाले आहेत.या पार्श्वभूमीवर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने परिक्षेत्रातील सर्व क्षेत्र सहाय्यकांना सतर्कतेबरोबरच आपआपल्या क्षेत्रात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागभीड वनपरिक्षेत्रात नागभीड, डोंगरगाव आणि मिंडाळा हे तीन क्षेत्र असून या क्षेत्रातील वनरक्षक, अधिसंख्य वनमजूर, बारमाही मजूर यांच्या चमू तयार करून गस्त घालावी, असे या पत्रात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यानी म्हटले आहे.ही गस्त सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भोजन व विसावा यासाठी या कर्मचाऱ्यांना मधल्या काळात दोन तासांची सूट देण्यात आली आहे.२६ तारखेपासून ही गस्त सुरू असून २ क्षेत्र सहाय्यक, ९ वनरक्षक, ५ वनमजूर या गस्तीमध्ये सहभागी आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात येणार, असे वनविभाग म्हणत आहे.

 

टॅग्स :forestजंगल