चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन मंदिर, किल्ले कात टाकणार; मुनगंटीवार यांनी पाठवला प्रस्ताव

By राजेश भोजेकर | Published: November 24, 2023 03:21 PM2023-11-24T15:21:21+5:302023-11-24T15:26:00+5:30

गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात केली चंद्रपूर शहराची स्थापना

14 ancient temples, forts in Chandrapur district will be restored; Sudhir Mungantiwar sent a proposal of Rs 57 Crore 96 Lakhs | चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन मंदिर, किल्ले कात टाकणार; मुनगंटीवार यांनी पाठवला प्रस्ताव

चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन मंदिर, किल्ले कात टाकणार; मुनगंटीवार यांनी पाठवला प्रस्ताव

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 57 कोटी 96 लक्ष 95 हजार 375 रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा विकास  होणार आहे. यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांनी नुकताच नियोजन सभागृह येथे आढावा घेतला. 

बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,बजिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक अमोल गोटे आदी उपस्थित होते. चंद्रपूरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिर, प्राचीन गडकिल्ले व वास्तु आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आता त्यांचे रूप पालटणार आहे.

बैठकीत बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, पुरातत्व स्थळांचा विकास करताना कामाची गुणवत्ता, दर्जा आणि कामाची गती यावर स्थानिक नागरीकांनी लक्ष ठेवावे. पुरातत्व विभागाने प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा नागरीकांची टीम तयार करावी. लोकसहभागातूनच या स्थळांचा विकास होईल, याबाबत नियोजन करावे. प्रत्येक ठिकाणी कामांची माहिती देणारा एक फलक तर संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा दुसरा फलक लावावा. यात ‘क्यूआर कोड’चा समावेश असावा. 

Web Title: 14 ancient temples, forts in Chandrapur district will be restored; Sudhir Mungantiwar sent a proposal of Rs 57 Crore 96 Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.