अवैध दारूसह १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:04+5:302021-07-05T04:18:04+5:30

घुग्घुस : घुग्घुस-चंद्रपूर रस्त्यावर घुग्घुस गुन्हे अन्वेषणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करून यवतमाळ जिल्ह्यातील वणीकडून संशयास्पद येणाऱ्या ट्रकला (क्र. एमएच ...

12 lakh worth of illicit liquor seized | अवैध दारूसह १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैध दारूसह १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

घुग्घुस : घुग्घुस-चंद्रपूर रस्त्यावर घुग्घुस गुन्हे अन्वेषणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करून यवतमाळ जिल्ह्यातील वणीकडून संशयास्पद येणाऱ्या ट्रकला (क्र. एमएच ३४ एम ५०२३) अडवून झडती घेतली असता, त्यात एक लाख ९५ हजार रुपये किमतीच्या १२ पेट्या देशी-विदेशी दारू आढळून आली.

पोलिसांनी १० लाखाच्या ट्रकसह एकूण १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. सईद अहमद खान (४२) रा. रवींद्रनगर बल्लारपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई घुग्घुसचे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सचिन बोरकर, रणजित भुसे, महेंद्र वन्नकवार, नितीन मराठे, ज्ञानेश्वर जाधव, सचिन डोहे यांनी केली. सदर ट्रक हा बल्लारपूरवरून लाकूड घेऊन यवतमाळ गेला होता व लाकूड उतरवून वणी येथून अवैध दारू आणल्याचे पोलिसांकडून कळते.

Web Title: 12 lakh worth of illicit liquor seized