२४ तासांत १० कोरोना पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:57+5:302021-02-06T04:50:57+5:30

सुरुवातीपासून आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार १०५ झाली. त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ६०३ झाली ...

10 corona positive were found in 24 hours | २४ तासांत १० कोरोना पॉझिटिव्ह आढळले

२४ तासांत १० कोरोना पॉझिटिव्ह आढळले

सुरुवातीपासून आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार १०५ झाली. त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ६०३ झाली आहे. सध्या ११० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख दोन हजार ३८० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ७७ हजार २२६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात ३९२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३५४, तेलंगणा १, बुलडाणा १, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा १ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आढळलेल्या १० रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ३, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी प्रत्येकी १, मूल २ व वरोरा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 10 corona positive were found in 24 hours