शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

Indian Navy Tradesman Recruitment 2021: नौदलात मोठी भरती, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 2:38 PM

पाहा कसा, कधी कराल अर्ज आणि किती असेल वेतन

ठळक मुद्देभारतीय नौदलात निघाली मोठी भरतीदहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही नोकरीची संधी

Indian Navy Tradesman Recruitment 2021:  भारतीय नौदलात सेवा बजावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या अंतर्गत ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांज आणि सदर्न नेव्हल कमांडमध्ये १,१५९ पदांसाठी अर्ज मागवण्यात आलं आहेत. २२ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसंच ७ मार्च संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अरज करता येतील. यामध्ये ईस्टर्न नेव्हल कमांडसाठी ७१० पदं, वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये ३२४ पदं, सदर्न नेव्हल कमांडमध्ये १२५ पदं अशा एकूण १,१५९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना मॅट्रिक्स लेव्हल १ च्या आधारावर वेतन मिळेल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना १८ हजार रूपयांपासून ५६,९०० रूपयांपर्यंत वेतन देण्यात येईल. कोण करू शकतं अर्ज?ट्रेड्समॅन मेट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची हायस्कूल अथवा १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आयटीआय प्रमाणपत्र असणं देखील अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १८ ते २५ वर्षांच्या मध्ये असणं आवश्यक आहे.किती असेल शुल्क?सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील विद्यार्थ्यांना २०५ रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी, पीएडब्ल्यूडी, माजी कर्मचारी आणि महिला वर्गाच्या उमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ट्रेड्समॅन मेट पदांच्या उमेदवारांची निवड ऑनलाईन कंप्म्युटर बेस्ड परीक्षेच्या आधारावर होणार आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा

 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलjobनोकरीonlineऑनलाइन