DFCCIL: भारतीय रेल्वेच्या ‘या’ विभागात १०७४ पदांवर भरती; १.६० लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:06 PM2021-04-27T22:06:03+5:302021-04-27T22:08:56+5:30

DFCCIL: दहावी उत्तीर्ण ते आयटीआय करणारे तसेच संबंधित ट्रेडचा डिप्लोमा, पदवी, एमबीए किंवा पीजीडीएम आणि इंजिनीअरिंग अशी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

dfccil recruitment 2021 dedicated freight corridor vacancy for 1074 post for graduate engineers with mba | DFCCIL: भारतीय रेल्वेच्या ‘या’ विभागात १०७४ पदांवर भरती; १.६० लाखांपर्यंत पगार

DFCCIL: भारतीय रेल्वेच्या ‘या’ विभागात १०७४ पदांवर भरती; १.६० लाखांपर्यंत पगार

Next

मुंबई: कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत हळूहळू जग सावरताना दिसत आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहे. सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. भारत सरकारने डेडिकेटेड फ्रेट कोरिडोर (Dedicated Freight Corridor) साठी भरती सुरू केली आहे. दहावीनंतर आयटीआय करणाऱ्यांपासून ग्रॅज्युएट ते इंजिनीअर्सपर्यंत सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी विविध पदांवर नोकरीची संधी आहे. (dfccil recruitment 2021 dedicated freight corridor vacancy for 1074 post for graduate engineers with mba)

ही भरती डेडिकेटेड फ्रेट कोरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्ये होत आहे. १०७४ पदांनुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण ते आयटीआय करणारे तसेच संबंधित ट्रेडचा डिप्लोमा, पदवी, एमबीए किंवा पीजीडीएम आणि इंजिनीअरिंग अशी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

Indian Navy मध्ये २५०० हजार रिक्त पदांसाठी मोठी भरती; ६९ हजारांपर्यंत पगार

DFCCIL मधील पदांची माहिती

ज्युनियर मॅनेजर (सिविल) - ३१ पदे, ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशंस अँड बीडी) - ७७ पदे, ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) - ३ पदे, एक्झिक्युटिव (सिविल) - ७३ पदे, एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - ४२ पदे, एक्झिक्युटिव (सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन) - ८७ पदे, एक्झिक्युटिव (ऑपरेशंस अँड बीडी) - २३७ पदे, एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - ३ पदे, ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - १३५ पदे, ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन) - १४७ पदे, ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशंस अँड बीडी) - २२५ पदे, ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - १४ पदे अशा एकूण १ हजार ०७४ पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 

नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत अनेक रिक्त पदांवर भरती; ६० लाखांपर्यंत पगार 

DFCCIL पदांसाठी वेतन

एक्झिक्युटिव पदांसाठी ३० हजार ते १.२० लाख रुपये, ज्युनियर एक्झिक्युटिव पदांसाठी २५ हजार ते ६८ हजार रुपये, ज्युनियर मॅनेजर पदांसाठी ५० हजार ते १.६० लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. याव्यतिरिक्त अन्य भत्तेही लागू असतील. संगणक आधारित परीक्षेच्या आधारे निवड होईल. ज्युनियर मॅनेजर पदांसाठी सीबीटीनंतर मुलाखतींची फेरीदेखील होईल.

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीत स्कॉलरशिप

कसा कराल अर्ज?

या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी तुम्हाला DFCCIL ची वेबसाइट dfccil.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया २४ एप्रिलपासून सुरू झाली असून, २३ मे २०२१ पर्यंत अर्जांची मुदत आहे. ज्युनियर मॅनेजर पदासाठी अर्ज शुल्क १ हजार रुपये, एक्झिक्युटिवसाठी ९०० रुपये आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव पदासाठी अर्ज शुल्क ७०० रुपये आहे. सामान्य, ओबीसी एनसीएल आणि आर्थिक दुर्बल गटासाठी अर्ज शुल्क असेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे.
 

Web Title: dfccil recruitment 2021 dedicated freight corridor vacancy for 1074 post for graduate engineers with mba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.