Indian Navy मध्ये २५०० हजार रिक्त पदांसाठी मोठी भरती; ६९ हजारांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:47 PM2021-04-24T20:47:28+5:302021-04-24T20:48:37+5:30

indian navy recruitment 2021: भारतीय नौदलात (Indian Navy) ने विविध २५०० पदांवर मोठी भरती काढली आहे.

indian navy recruitment 2021 nausena navik navy sailor vacancy for 12th pass | Indian Navy मध्ये २५०० हजार रिक्त पदांसाठी मोठी भरती; ६९ हजारांपर्यंत पगार

Indian Navy मध्ये २५०० हजार रिक्त पदांसाठी मोठी भरती; ६९ हजारांपर्यंत पगार

googlenewsNext

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली होती. मात्र, हळूहळू उद्योग, व्यवसाय सावरताना दिसत आहेत. नोकरीच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरीची (Govt Job 2021) सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलात (Indian Navy) ने विविध २५०० पदांवर बंपर भरती (Navy Sailor Vacancy) काढली असून, या पदांवर मासिक ६९ हजार रुपये पे-स्केलनुसार वेतन मिळेल. (indian navy recruitment 2021 nausena navik navy sailor vacancy for 12th pass)

या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. भारत सरकार / राज्य सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्कूल/बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक. बारावी मॅथ्स, फिजिक्सचा अभ्यास आवश्यक. सोबतच केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समधील कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा, असे सांगितले जात आहे. 

नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत अनेक रिक्त पदांवर भरती; ६० लाखांपर्यंत पगार 

कसा कराल अर्ज?

इंडियन नेव्हीची वेबसाइट joinindiannavy.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २६ एप्रिल २०२१ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ आहे. जनरल आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना २१५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज नि:शुल्क आहे. भारतीय नौदल नाविक व्हेकन्सी २०२१ साठी ज्यांचा जन्म १ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ या दरम्यानचा असेल, असे उमेदवार अर्ज करू शकतात.

पदांची माहिती आणि वेतन

अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) - ५०० पदे, सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) - २००० पदे अशी एकूण २५०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या पदांसाठी पे-स्केलनुसार २१ हजार ७०० रुपयांपासून ते ६९ हजार १०० रुपये प्रति महिना पर्यंत पगार मिळू शकतो.
 

Web Title: indian navy recruitment 2021 nausena navik navy sailor vacancy for 12th pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.