idbi bank recruitment 2021 vacancies for different post in idbi bank | नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत अनेक रिक्त पदांवर भरती; ६० लाखांपर्यंत पगार 

नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत अनेक रिक्त पदांवर भरती; ६० लाखांपर्यंत पगार 

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली होती. मात्र, हळूहळू उद्योग, व्यवसाय सावरताना दिसत आहेत. नोकरीच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. बँकेतनोकरी (Bank Jobs 2021) करण्याची इच्छा असणाऱ्यांना उत्तम संधी आहे. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२१ आहे. (idbi bank recruitment 2021 vacancies for different post in idbi bank)

IDBI बँकेतील नोकरीसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार आयडीबीआयचे अधिकृत संकेतस्थळ idbibank.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. IDBI बँक, निवडलेल्या उमेदवारांनी जाहीरातीत दिलेल्या शाखेसह अन्य कोणत्याही शाखेत नियुक्ती देऊ शकते. मात्र, अर्ज करण्यापूर्वी माहिती आणि नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, असा सल्ला दिला जात आहे. 

अर्ज कसा करायचा?

IDBI Bank ने चीफ डेटा ऑफिसर, डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर सह अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटद्वारे अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून भरावा. अर्ज केल्यानंतर ई-मेलच्या विषयात पदाचे नाव लिहा आणि 'recruitment@idbi.co.in' या ई-मेल आयडी वर पाठवून द्या. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२१ आहे. 

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीत स्कॉलरशिप

रिक्त पदांची माहिती

IDBI Bank मध्ये चीफ डेटा ऑफिसरचे १ पद, हेड - प्रोग्रामर मॅनेजमेंट अँड इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे (आयटी) १ पद, डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरचे (चॅनल) - १ पद, डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (डिजिटल) १ पद, चीफ इनफॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर - १ पद, हेड - डिजिटल बँकिंगसाठी - १ पद अशा जागा रिक्त आहेत. 

पदांसाठी शैक्षणिक पात्रता 

कोणत्याही मान्यता प्राप्त युनिवर्सिटीमधून MCA सह पदवी किंवा इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार चीफ डेटा ऑफिसर, हेड, डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी पदांसाठी अर्ज करू शकतात. चीफ इनफॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर हेड डिजिटल बँकिंग पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारख्या संबंधित विषयांतून इंजिनीअरिंगची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. 

विविध रिक्त पदांसाठी मिळणारे वेतन

चीफ इनफोर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर आणि हेड - डिजिटल बँकिंग ऑफिसर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ५० ते ६० लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतन मिळेल. अन्य सर्व पदांसाठी वार्षिक पॅकेज ४० ते ४५ लाख रुपये आहे.
 

Web Title: idbi bank recruitment 2021 vacancies for different post in idbi bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.