भारतीय हवाई दलात अग्निवीर बनण्याची संधी, IAF कडून अधिसूचना जारी; जाणून घ्या पात्रता निकष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:35 IST2026-01-13T15:34:17+5:302026-01-13T15:35:52+5:30
Agniveer Bharti 2027: अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.

भारतीय हवाई दलात अग्निवीर बनण्याची संधी, IAF कडून अधिसूचना जारी; जाणून घ्या पात्रता निकष
AgniveerVayu 2027 Bharti: अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. Indian Air Force (IAF) ने अग्निवीरवायु भरती 2027 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून, अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत
भारतीय हवाई दलाने 12 जानेवारी 2026 रोजी अग्निवीरवायु 2027 भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली. इच्छुक उमेदवारांनी https://iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2026 आहे.
कोण अर्ज करू शकतो?
अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय निकष ठरवण्यात आले आहेत.
वयोमर्यादा
कमाल वय : 21 वर्षे
जन्मतारीख : 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान
पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा समान
शैक्षणिक पात्रता
12वी उत्तीर्ण
विषय : गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी
एकूण किमान 50% गुण
इंग्रजी विषयात स्वतंत्रपणे 50% गुण अनिवार्य
वैद्यकीय व शारीरिक निकष
किमान उंची : 152 सेमी
पर्वतीय व ईशान्य भारतातील महिला उमेदवारांना 5 सेमी उंची सवलत
दात, ऐकण्याची क्षमता, दृष्टी यांचे ठरावीक निकष लागू
पुरुष व महिला उमेदवारांसाठी वैद्यकीय निकष वेगवेगळे
वैवाहिक स्थिती
फक्त अविवाहित उमेदवार पात्र
महिला उमेदवार गर्भवती आढळल्यास भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल
निवड प्रक्रिया कशी असेल?
अग्निवीरवायु 2027 भरतीची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांत होईल:
ऑनलाईन लेखी परीक्षा
कागदपत्र पडताळणी
शारीरिक चाचणी
पुरुष : 1.6 किमी धावणे – 7 मिनिटांत
महिला : 1.6 किमी धावणे – 8 मिनिटांत
यासोबत पुश-अप्स, सिट-अप्स, स्क्वॅट्स
अॅडॅप्टेबिलिटी टेस्ट
वैद्यकीय तपासणी
अंतिम गुणवत्ता यादी
देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी अग्निवीरवायु 2027 ही भारतीय हवाई दलात प्रवेशाची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून निवड प्रक्रियेसाठी तयारी करावी.