शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव

By admin | Updated: August 21, 2014 23:23 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

सिंदखेडराजा : तालुक्यातील काही जि.प. शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुक्यातील आडगावराजा येथे जि.प. उच्च प्राथमिक केंद्रीय शाळा आहे. त्यामध्ये पहिली ते सातवीपर्यंत १0३ मुली व १00 मुले शिक्षण घेत असून, त्यासाठी ७ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेला ५ संगणक असून, ते विद्युतअभावी धूळ खात पडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या संगणकाचा काहीही फायदा होत नाही. तसेच मुलींसाठी येथे शौचालय आहे. परंतु सदर शौचालय हे कायमचे बंद असल्याची माहिती आहे. शालेय पोषण आहारातही शासनाने ठरवून दिलेल्या विविध जीवनसत्वयुक्त अन्नघटकांचा वापर होत नाही. त्यामुळे येथील खिचडी चविष्ट होत नसल्याने विद्यार्थी पोषण आहार घेण्याचे टाळतात. तसेच या शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आडगावराजा येथेच जिजामाता विद्यालय असून, ८ वी ते १0 वी पर्यंत वर्ग आहेत. त्यामध्ये ५६ विद्यार्थी व ५८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, पाच शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतही शैक्षणिक सुविधांचा व विविध मूलभूत सुविधांचा बोजवारा होत आहे. येथे विद्यार्थिनींकरिता शौचालय असून, ते बंदच आहे. विद्यार्थ्यांंना माहिती संप्रेषण हा ५0 गुणांचा विषय असून, तो विद्यालयामध्ये संगणक नसल्यामुळे शिकविला जात नसल्याची माहिती आहे. विद्यालयातील प्रयोगशाळेतील साहित्यही अडगळीत पडलेले आहे. शासन ग्रामीण विद्यार्थ्यांंना भौतिक सुविधा देण्याच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतानाही प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांंना याचा कोठेही फायदा होत नसल्याची परिस्थिती आहे.