शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 11:47 IST

आगाशिवनगर येथील घटना

मलकापूर : घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा कोयना नदीपात्रात वाहून गेल्यामुळे बुडून मृत्यू झाला. आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ जाधव पानवठ्यावर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोयना नदीच्या पाण्याला प्रवाह असल्यामुळे संबंधित युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.  

               चैतन्य उर्फ चेतन विजय शिंदे ( वय २२, रा. काका शिंदे कॉलनी, आगाशिवनगर , मलकापूर  ता. कराड ) असे नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे.  

  घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य शिंदे हा भाऊ गणेशसह दोन मित्रासोबत गुरूवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरगुती गणपती विसर्जनासाठी गेला होता. आगाशिवनगर येथील मलकापूर पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ असलेल्या जाधव पानवठ्यावर गणेशमुर्तीचे विसर्जन करत असताना चैतन्यचा पाय घसरून कोयना नदीपात्रात पडला. कोयना नदीच्या पाण्याला प्रवाह असल्यामुळे तो प्रवाहाबरोबर वाहत गेला. पोहता येत नसल्यामुळे चैतन्य नदीत बुडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी इतरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र, पाण्याला जास्त प्रवाह असल्यामुळे काही अंतरातच तो नदीपात्रात बुडाला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी घाटनास्थळी धाव घेतली. त्याचा शोध घेण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहे. शोधकार्यासाठी महाबळेश्वर येथील ट्रेकर्सला पाचारण करण्यात आले आहे. यावेळी पानवठ्यावर आगाशिवनगर येथिल युवकांसह नागरिकांची गर्दी झाली होती.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव