दहावीची परीक्षा रद्द केली ; परीक्षा शुल्क कधी परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:58+5:302021-05-17T04:32:58+5:30

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. परीक्षा रद्द ...

X exam canceled; When will the examination fee be refunded? | दहावीची परीक्षा रद्द केली ; परीक्षा शुल्क कधी परत करणार

दहावीची परीक्षा रद्द केली ; परीक्षा शुल्क कधी परत करणार

Next

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील ४५ हजार ६८ विद्यार्थ्यांना १़ ८७ काेटी रुपये परीक्षा शुल्क परत कधी मिळणार? याची प्रतीक्षा लागून आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा देखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ६६१ आहेत. यामध्ये एकूण ४५ हजार ६८ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट ४५ हजार ६८ विद्यार्थी पास झाले आहेत. दहावी परीक्षेचे शुल्क ४१५ रुपये असून, ४५ हजार ६८ विद्यार्थ्यांनी एकूण एक काेटी ८७ लाख ३ हजार २२० रुपये परीक्षा शुल्क भरले आहे. परीक्षाच रद्द झाल्याने शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, शुल्क परत केव्हा मिळणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

अशी आहे जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा -६६१

दहावीतील एकूण विद्यार्थी : ४५०६८

प्रती विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५

एकूण परीक्षा शुल्काची रक्कम -१़ ८७ काेटी

कोट

शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झालेली आहे. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बुलडाणा

...................

कोट

कोरोनामुळे दहावीच्या शाळा जवळपास १ महिनाभर सुरू होत्या. त्यानंतर शाळाही बंद होत्या. ऑनलाईन पद्धतीने शिकवणी झाली. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शुल्क परत मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.

- पायल वानखडे, विद्यार्थिनी

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे परीक्षा शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. आतापर्यंत परीक्षा शुल्क परत मिळायला हवे होते.

- सतीश इंगळे, विद्यार्थी

दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ मात्र, अकरावी, आयटीआय प्रवेश कसे हाेणार याविषयी संभ्रम आहे़ तसेच परीक्षा शुल्क कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे़

राेहित गवई, विद्यार्थी

Web Title: X exam canceled; When will the examination fee be refunded?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.