दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली चुकीची प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:40 IST2017-03-11T01:40:11+5:302017-03-11T01:40:11+5:30

२0 मिनिट उशिरा सुरू झाला हिंदीचा पेपर

Wrong question papers given by students of Class X students | दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली चुकीची प्रश्नपत्रिका

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली चुकीची प्रश्नपत्रिका

खामगाव, दि. १0- येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या १0 वीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांंंना चुकीची प्रश्नपत्रिका वितरित झाल्याने सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांंंना मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळात पेपर २0 मिनिट उशिरा सुरू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वा. १0 वीच्या विद्यार्थ्यांंंचा हिंदीचा पेपर होता. यावेळी सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांंंना म्युनिसिपल हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर हिंदी-संस्कृतऐवजी हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर ह्या प्रश्नपत्रिका गोळा करून हिंदी-संस्कृत विषयाची प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आली. या प्रकारात २0 मिनीट विलंब झाल्याने पेपर सोडविण्याकरिता तेवढा वेळ वाढवून देण्यात आला.

Web Title: Wrong question papers given by students of Class X students